विश्वचषक नेमबाजी : भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी, मिश्र सांघिक गटात क्लीन स्वीप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 02:43 AM2019-05-31T02:43:13+5:302019-05-31T02:43:33+5:30

भारताने ५ सुवर्ण आणि एक रौप्यपदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले

World Cup shooting: India's best ever performance, clean sweep in the mixed team category | विश्वचषक नेमबाजी : भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी, मिश्र सांघिक गटात क्लीन स्वीप

विश्वचषक नेमबाजी : भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी, मिश्र सांघिक गटात क्लीन स्वीप

Next

नवी दिल्ली : भारताने गुरुवारी जर्मनीच्या म्युनिच येथे मिश्र सांघिक स्पर्धेत दोन्ही विजेतेपद आपल्या नावावर करताना एकूण ५ सुवर्णपदक जिंकून आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात आपली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. भारताने ५ सुवर्ण आणि एक रौप्यपदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले, तर दुसऱ्या स्थानावर असणाºया चीनने दोन सुवर्ण, २ रौप्य आणि ५ कास्यांसह एकूण ९ पदके प्राप्त केली.

भारतातर्फे अपूर्वी चंदेला (१० मी. एअर रायफल), राही सरनोबत (२५ मी. पिस्टल) व सौरभ चौधरी (१० मी. एअर पिस्टल) यांनी सुवर्ण जिंकले. अखेरच्या दिवशी भारताने सांघिक मिश्रमध्ये दोन सुवर्णपदक पटकावले.

अंजुम मोदगिल व दिव्यांशसिंग पनवार यांनी १० मी. एअर रायफल मिश्र सांघिक सुवर्ण पटकावले, तर मनू भाकर व सौरभ चौधरी या जोडीने १० मी. एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत अव्वल स्थान मिळवले. मिश्र एअर रायफलमध्ये अपूर्वी चंदेला व दीपक कुमार यांना अंजुम-दिव्यांशसिंगकडून २-१६ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंजुम-दिव्यांश यांनी ६२९.१ गुणांसह फायनलमध्ये पात्रता मिळवली. ते अपूर्वी-दीपकहून ०.१ गुणांनी आघाडीवर होती.

मनू आणि सौरभ यांना एअर पिस्तूल फायनल्समध्ये ओलिना कोस्टेविच आणि ओलेह ओमेलचूक या युक्रेनच्या अनुभवी जोडीकडून कडवे आव्हान मिळाले; परंतु त्यांनी १७-९ असा विजय मिळवला.

Web Title: World Cup shooting: India's best ever performance, clean sweep in the mixed team category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.