संतापजनक! राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या महिला नेमबाजाला सत्कार समारंभात बसवले जमिनीवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 08:19 PM2018-04-17T20:19:45+5:302018-04-17T20:44:56+5:30

सत्कार समारंभासाठी आलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील महिला नेमबाजाला जमिनीवर बसवण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

The women's gold medalist had to sit on ground | संतापजनक! राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या महिला नेमबाजाला सत्कार समारंभात बसवले जमिनीवर 

संतापजनक! राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या महिला नेमबाजाला सत्कार समारंभात बसवले जमिनीवर 

Next

नवी दिल्ली -  सत्कार समारंभासाठी आलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील महिला नेमबाजाला जमिनीवर बसवण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. चारखी दादरी येथे फोगाट खाप पंचायतीने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंचा सत्कार केला. या कार्यक्रमात हीना सिद्धूला नमवून नेमबाजीत सुवर्णपदक पटकावणाऱ्या मनू भाकर हिला सन्मानित करताना जमिनीवर बसवण्यात आले. कार्यक्रमादरम्यान त्यावर काही लोकांनी आक्षेपही घेतला मात्र मनूच्या वडिलांनी मोठ्यांना मान द्यायचा हे आपल्या मुलीवरील संस्कार असल्याचे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

या कार्यक्रमात सुरुवातीला सर्व खेळाडूंना स्टेजवर बसवण्यात आले होते. त्यादरम्यान चरखी दादरीचे एसपी हिंमांशू गर्ग तेथे पोहोचले. त्यांच्यासाठी एक खुर्ची रिकामी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले. त्यावेळी मनू भाकर हिने उठून एसपींना जागा दिली. त्यानंतर मनूच्या वडिलांनीही मोठ्यांचा आदर राखायचे संस्कार आपल्या मुलीवर असल्याचे सांगितले.  

मनू भाकरने राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. लहानपणापासून मनूला बॉक्सिंग, टेनिस, स्केटींग, कराटे  या खेळांचे वेड होते. प्रत्येक खेळात तिची कामगिरी उल्लेखनीय होती. पण फक्त एकाच खेळात कारकिर्द घडवण्याचा सल्ला तिला कुटुंबियांनी दिला. त्यावेळी तिने नेमबाजीमध्ये कारकिर्द घडवण्याचा निर्णय घेतला आणि साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण कुटुंबियांना मनूवर विश्वास होता. तिच्या बाबांनी तब्बल दीड लाख रुपये मनूच्या नेमबाजीवर खर्च केले आणि मनूनेही त्यांना निराश केले नाही. कारण या वर्षी झालेल्या नेमबाजीच्या विश्वचषकात तिने दोन सुवर्णपदके पटकावली आणि मनू नावाचा जयघोष भारतामध्ये सुरु झाला. कारण नेमबाजी विश्वचषकात सुवर्णपदक पटकावणारी ती भारताची सर्वात युवा खेळाडू ठरली. सोळावं वर्ष धोक्याचं म्हटलं जातं, पण याच सोळाव्या वर्षी तिने जग जिंकले होते.  

Web Title: The women's gold medalist had to sit on ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.