‘खेलो इंडिया’त कॉर्पाेरेट जगताचे स्वागत - राज्यवर्धन सिंह राठोड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 08:36 PM2018-11-20T20:36:57+5:302018-11-20T20:37:53+5:30

२०२८ मध्ये आॅलिम्पिकमध्ये भारत अव्वल देशांत

Welcoming the corporate world to 'Play India' - Rajyavardhan Singh Rathore | ‘खेलो इंडिया’त कॉर्पाेरेट जगताचे स्वागत - राज्यवर्धन सिंह राठोड

‘खेलो इंडिया’त कॉर्पाेरेट जगताचे स्वागत - राज्यवर्धन सिंह राठोड

googlenewsNext
ठळक मुद्देराठोड पुढे म्हणाले की, क्रीडा क्षेत्रासाठी २०१८ हे वर्ष सर्वश्रेष्ठ राहिले आहे. मला भारतीय युवा खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा आहेत

सचिन कोरडे : गुणवान आणि कौशल्यवान अशा शालेय विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षणाची उपलब्धता करून देण्यासाठी ‘खेलो इंडिया’ या उपक्रमाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे. या उपक्रमासाठी आतापर्यंत ८० अकादमींनी पुढाकार घेतला आहे. आम्ही लवकरच कॉर्पाेरेट जगतासह स्वयंसेवी संस्थांनाही यात सामील करून घेणार आहोत. त्यांचे आम्ही स्वागत करतो. त्या दृष्टीने या उपक्रमाची आखणी केली जात आहे. शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात आणण्यासाठी हा सर्वात महत्त्वपूर्ण असा उपक्रम आहे. या उपक्रमातून आम्ही वर्षातून १ हजार विद्यार्थ्यांना ८ वर्षांसाठी शिष्यवृत्ती देत आहोत. भविष्यात याचा निकाल स्पष्ट दिसून येईल. निश्चितच, २०२८ मध्ये भारत आॅलिम्पिक पदक तालिकेत अव्वल देशांमध्ये असेल, असा विश्वास केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी व्यक्त केला. 
राठोड यांनी गोव्यातील सेसा फुटबॉल अकादमीच्या खेळाडूंचा गौरव केला. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सेसा अकादमीसुद्धा खेलो इंडियाचा एक भाग बनेल, अशी घोषणा राठोड यांनी केली. ते म्हणाले, आमचे अधिकारी येथील साधनसुविधांचा अभ्यास करतील. त्यानंतर आम्ही सेसाला या उपक्रमात सामावून घेऊ. राठोड पुढे म्हणाले की, क्रीडा क्षेत्रासाठी २०१८ हे वर्ष सर्वश्रेष्ठ राहिले आहे. मला भारतीय युवा खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा आहेत. भविष्याच्या दृष्टीने आम्ही प्रक्रिया सुरू केलेली आहे. स्थिती बदलताना दिसत आहे. टोकियो आॅलिम्पिक स्पर्धा आता जवळच आहे. आम्ही आमच्याकडून सर्वश्रेष्ठ प्रदर्शनाचा प्रयत्न करू. स्पर्धेत उतरण्यापूर्वी आम्ही किती पदके जिंकू याची कल्पनाही येईल. माझे लक्ष्य २०२४ आणि २०२८ आॅलिम्पिक हे आहे. आपण ज्या पद्धतीने खेळत आहोत त्यावरून भारत २०२८ मध्ये अव्वल पदक विजेत्यांमध्ये असेल. २०२४ मधील आॅलिम्पिक स्पर्धा पॅरिसमध्ये तर २०२८ मधील आॅलिम्पिक स्पर्धा लॉस एंजिल्स येथे होतील.


तरुणांनो स्पर्धात्मक भावना विकसित करा
स्वत: आॅलिम्पियन असलेल्या राज्यवर्धन राठोड यांनी साखळी येथील सेसा अकादमी कॅम्पसमध्येयुवा फुटबॉलपटूंशी संवाद साधला. त्यांनी प्रत्येक खेळाडूंची ओळख करून घेतली. त्यांनी तरुणांना संदेशही दिला. ते म्हणाले, जोपर्यंत आपल्यात स्पर्धात्मक भावना जागृत होत नाहीत, तोपर्यंत आपण उत्तम खेळाडू बनू शकत नाही. त्यामुळे स्पर्धात्मक भावना निर्माण करा. काहीतरी करण्याची भूक पोटात असेल तर तुम्हाला तुमच्या ध्येयापासून कोणीही वंचित करू शकत नाही. 

ये लातोसेही बोलते है!.
राज्यवर्धन यांनी सेसा अकादमीच्या युवा खेळाडूंची विचारपूस केली. प्रचंड उकाडा असतानाही त्यांनी खेळाडूंना वेळ दिला. त्यांच्यातील एक खेळाडू स्पष्ट जाणवला. मात्र, राज्यवर्धन यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात युवकांना काही जमले नाही. त्यांनी खुलेपणाने राठोड यांच्याशी संवाद साधला नाही. हे सेसा अकादमीचे अनन्य अग्रवाल यांनी बोलून दाखवले. त्यावर राठोड यांनी खेळाडूंचीच बाजू घेतली. ते म्हणाले, आम्ही खेळाडू बोलतोच कमी. हे तर फुटबॉलर आहेत... ये तो लातोसेही बात करेंगे!...यावर मात्र खेळाडूंकडून टाळ्या पडल्या. 

क्रीडा संहिता अंमलबजावणीची जबाबदारी राष्ट्रीय संघटनांची 
देशात क्रीडा संहिता लागू करण्यासाठी कॅबिनेटच्या मंजुरीची गरज नाही. राष्ट्रीय संघटनांनी क्रीडा संहिता अंमलबजावणीची जबाबदारी घ्यावी. क्रीडा क्षेत्रात पारदर्शी आणि निष्पक्ष कारभारासाठी क्रीडा संहिता आखण्यात आली आहे. ती लागू करावी, असा माझा आग्रह आहे, असे राठोड यांनी सांगितले. मात्र, बºयाच राज्यांतील राष्ट्रीय संघटनांनी क्रीडा संहिता लागू केलेली नाही. या संहितेला उधळून टाकत संघटनांनी आपल्या निवडणुकाही घेतला. त्यामुळे क्रीडा संहितेबाबत सध्या संभ्रमाचे वातावरण आहे; कारण संहितेला कॅबिनेटची मंजुरी मिळालेली नाही, असे संघटनांकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: Welcoming the corporate world to 'Play India' - Rajyavardhan Singh Rathore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा