निवृत्तीनंतर उसेन बोल्टने बारमध्ये खर्च केले 6 लाख रूपये ? सोशल मीडियावर बिलाचा फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 11:39 AM2017-08-21T11:39:55+5:302017-08-21T11:44:13+5:30

पृथ्वीतलावरील सर्वात वेगवान व्यक्ती म्हणून ख्याती असलेला धावपटू उसेन बोल्ट याने धावपट्टीला अलविदा केलं आहे

Usain Bolt spent six lakhs in the bar after retirement? The photo of the bill on social media viral | निवृत्तीनंतर उसेन बोल्टने बारमध्ये खर्च केले 6 लाख रूपये ? सोशल मीडियावर बिलाचा फोटो व्हायरल

निवृत्तीनंतर उसेन बोल्टने बारमध्ये खर्च केले 6 लाख रूपये ? सोशल मीडियावर बिलाचा फोटो व्हायरल

googlenewsNext
ठळक मुद्देपृथ्वीतलावरील सर्वात वेगवान व्यक्ती म्हणून ख्याती असलेला धावपटू उसेन बोल्ट याने धावपट्टीला अलविदा केलं आहेनिवृत्तीनंतर उसेन बोल्ट याने लंडनमधील एका बारमध्ये त्याच्या मित्रांसोबत पार्टी केली.या पार्टीमध्ये त्या सगळ्यांचं मिळून एकुण 6 लाख रूपये ( £7,000 ) बिल झाल्याचं समोर आलं आहे.

मुंबई, दि. 21- पृथ्वीतलावरील सर्वात वेगवान व्यक्ती म्हणून ख्याती असलेला धावपटू उसेन बोल्ट याने धावपट्टीला अलविदा केलं आहे. निवृत्तीनंतर उसेन बोल्ट याने लंडनमधील एका बारमध्ये त्याच्या मित्रांसोबत पार्टी केली. या पार्टीमध्ये त्या सगळ्यांचं मिळून एकुण 6 लाख रूपये ( £7,000 ) बिल झाल्याचं समोर आलं आहे. लंडनमधील त्या बारमध्ये उसेन बोल्च आणि त्याच्या मित्रांमी मिळून एकुण सहा लाख रूपयांची दारू प्यायल्याचं बोललं जातं आहे. लंडनच्या या बारच्या बिलाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. डेअली मिररने हे वृत्त दिलं आहे. 

उसेन बोस्ट आणि त्याच्या मित्रांनी मिळून त्या लंडनमधील बारमधून डोम पेरिग्नेन शॅम्पेनच्या 5 बाटल्या, वोडक्याची एक बाटली, कॉग्नाकच्या पाट बाटल्या, 23 रेड बुल्स आणि कोकाकोलाचे 18 कॅन्स विकत घेतले होते. या सगळ्याचं मिळून सहा लाख रूपये बिल झालं होतं. लंडनमध्ये आयएएफ (इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अॅथलेटिक्स फेडरेशन) तर्फे वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये  ४ बाय १०० मीटर रिले स्पर्धा तो पूर्ण करू शकला नव्हता. दुखापत झाल्याने तो त्या रेसमधून बाहेर गेला होता. 

वेगाचा बादशहा उसेन बोल्टला दु:खदायक निरोप-
ज्या ट्रॅकवर गेली अनेक वर्षे अधिराज्य गाजवले, त्याच ट्रॅकवर दुर्दैवीपणे कोसळणा-या उसेन बोल्टसाठी त्याचा निरोप मात्र दु:खदायक राहिला. उपस्थित चाहत्यांना जणू ‘वेग’ थांबल्याची अनुभूती आली. १०० मीटर धावण्याच्या शर्यतीतील अशक्यप्राय असे विक्रम नोंदवणाऱ्या बोल्टने आपल्या कारकिर्दीला विराम दिला. ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये तो सुवर्णपदकासाठी धावत होता. धावता धावता अचानक खाली कोसळला. हा क्षण सर्वांनाचा भावुक करणारा होता. बोल्टच्या कारकिर्दीचा असा शेवट होईल, असे कधीही वाटले नव्हते आणि म्हणूनच त्यालाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.

खाली पडला तेव्हा..
बोल्टला शेवटच्या लॅपमध्ये धावावे लागणार होते. जमैकाच्या तीन धावपटूंनी ३०० मीटर अंतर कापत आपले काम पूर्ण केले होते. मात्र, अंतिम लॅपमध्ये काही अंतर कापताच बोल्ट दुखापतग्रस्त झाला आणि खाली पडला. मांसपेशी ताणल्यामुळे बोल्टचे शेवटची शर्यत जिंकण्याचे स्वप्न भंगले. या स्पर्धेचे सुवर्णपदक यजमान ग्रेट ब्रिटनच्या टीमने पटकाविले. अमेरिका संघाने रौप्य तर जपानच्या संघाने कांस्यपदक पटकाविले.
 

Web Title: Usain Bolt spent six lakhs in the bar after retirement? The photo of the bill on social media viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.