Three crore help under 'Tops' - Rathod | ‘टॉप्स’अंतर्गत तीन कोटींची मदत - राठोड

नवी दिल्ली - ‘सरकारच्या वतीने २०१७ च्या अखेरच्या क्वार्टरमध्ये टार्गेट आॅलिम्पिक पोडियम (टॉप्स) अंतर्गत १७५ खेळाडूंना तीन करोड १४ लाख रुपयांचा भत्ता जाहीर केला,’ अशी माहिती केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी दिली.
क्रीडामंत्र्यांनी राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नाच्या लिखित उत्तरामध्ये म्हटले, ‘ही रक्कम राष्ट्रीय क्रीडा विकास विभागकडून गेल्यावर्षी सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान जाहीर करण्यात आली.’ त्यांनी म्हटले, ‘आऊट आॅफ पॉकेट अलाउन्स (ओपीए) अंतर्गत एनएसडीएफकडून प्रतिमहिना ५० हजार रुपये जाहीर करण्यात आले आणि हे सप्टेंबर २०१७ पासून लागू करण्यात आले होते.’ ‘टॉप्स’अंतर्गत आॅलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेतील संभाव्य पदकविजेत्यांना आर्थिक सहाय्य केले जाते. (वृत्तसंस्था)