उद्यापासून ठाणे महापौर चषक खो-खो स्पर्धेला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 07:12 PM2018-12-10T19:12:39+5:302018-12-10T19:12:54+5:30

या स्पर्धेत राज्यातील १६ पुरूष व १३ महिला संघ सहभागी होत असून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मैदान गाजवणाऱ्या खोखो खेळाडूंचा खेळ पाहण्याची संघी ठाणेकरांना लाभणार आहे.

Thane Mayor Trophy Kho-Kho Championship begins tomorrow | उद्यापासून ठाणे महापौर चषक खो-खो स्पर्धेला सुरूवात

उद्यापासून ठाणे महापौर चषक खो-खो स्पर्धेला सुरूवात

Next

ठाणे : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने तसेच ठाणे महानगर पालिका व ठाणे जिल्हा खोखो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरी येथील धर्मवीर क्रीडा संकूलात राज्यस्तरीयनिमंत्रित पुरूष व महिला गटाच्या खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यातील १६ पुरूष व १३ महिला संघ सहभागी होत असून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मैदान गाजवणाऱ्या खोखो खेळाडूंचा खेळ पाहण्याची संघी ठाणेकरांना लाभणार आहे. स्पर्धेतील सामने सकाळ व सायंकाळी प्रकाशझोतात होतील. स्पर्धेचे अंतिम सामने १४ डिसें रोजी होतील.

स्पर्धेची गटवारी खालील प्रमाणे :

पुरूष विभाग:
अ गट
१. विहंग क्रीडा मंडळ, ठाणे
२. सरस्वती स्पो. क्लब, मुंबई
३. श्री. सह्याद्री संघ, मुंबई उपनगर
४. श्रीकृष्ण क्रीडा मंडळ, सातारा

ब गट
१. नवमहाराष्ट्र संघ, पुणे
२. स्व.अरूणभैया नायकवडी युवा मंच, वाळवा
३. ग्रीफीन जिमखाना, ठाणे
४.युवक क्रीडा मंडळ, ठाणे

क गट
१. हिंदकेसरी , कवठेपिरान
२. प्रबोधन क्रीडाभवन, मुंबई उपनगर
३. दिनबंधू खो-खो क्लब, सोलापूर
४. शिवभक्त क्रीडा मंडळ, ठाणे

ड गट
१. शिर्सेकर्स म. गांधी स्पो अकॅडॅमी, मुंबई उपनगर
२. ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर, मुंबई
३. छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ, उस्मानाबाद
४. दि. युनायटेड स्पो. क्लब, ठाणे

महिला विभाग :
अ गट
१. शिवभक्त विद्यामंदिर, ठाणे
२. एकलव्य क्रीडा मंडळ, अहमदनगर
३. शिर्सेकर्स म. गांधी स्पो अकॅडॅमी, मुंबई उपनगर

ब गट
१. रा.फ.नाईक विद्यालय, ठाणे
२. योद्धा क्रीडा मंडळ, सांगली
३. साखरवाडी संघ, सातारा

क गट
१. नरसिंह क्रीडा मंडळ, पुणे
२. आर्यन स्पो. क्लब , रत्नागिरी
३. पद्मावती क्रीडा मंडळ, औरंगाबाद
४. ईगल्स, पुणे

ड गट
१. छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ, उस्मानाबाद
२. राजश्री शाहू महाराज विद्यालय, ठाणे
३. परांजपे स्पो. क्लब , मुंबई उपनगर

Web Title: Thane Mayor Trophy Kho-Kho Championship begins tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kho-Khoखो-खो