राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा : पुणे, सोलापूर, मुंबई उपनगर व सांगलीची विजयी सलामी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 06:40 PM2018-12-07T18:40:26+5:302018-12-07T18:40:56+5:30

गतविजेत्या पुण्याने आपलं खातं उघडताना 'अ' गटातील सामन्यात रायगड संघाचा (२३-२,०-४) २३-६ असा १ डाव व १७ गुणांनी पराभव केला. '

State championship and selection test kho-kho tournament: Pune, Solapur, Mumbai suburb and Sangli's winning opener | राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा : पुणे, सोलापूर, मुंबई उपनगर व सांगलीची विजयी सलामी

राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा : पुणे, सोलापूर, मुंबई उपनगर व सांगलीची विजयी सलामी

googlenewsNext

जळगांव : येथील छत्रपती शिवाजीमहाराज जिल्हा क्रीडा संकुलात सुरू झालेल्या महाराष्ट्र खो-खो असोसिएशन मान्यताप्राप्त व जळगांव जिल्हा खो-खो असोसिएशन आयोजित ३५ व्या किशोर किशोरी (१४वर्षाखालील) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत किशोरी गटात पुणे, नाशिक, अहमदनगर व सोलापूर तर मुलांमधे सोलापूर, मुंबई उपनगर, अहमदनगर व सांगली संघांनी विजयी सलामी दिली.

किशोरी विभागात गतविजेत्या पुण्याने आपलं खातं उघडताना 'अ' गटातील सामन्यात रायगड संघाचा (२३-२,०-४) २३-६ असा १ डाव व १७ गुणांनी पराभव केला. 'क' गटात नाशिकच्या मुलींनी धुळे संघावर (२१-१,०-२) २१-३ अशी १ डाव व १८ गुणांनी सहज मात केली नाशिकच्या वैजलनिशा सोमनाथ ने ४.१० मि संरक्षण करून आक्रमणात ३ गुण मिळवले तर मनिषा पडेरने २.५०मि नाबाद संरक्षण करून प्रतिस्पर्धी संघाचे ४ गडी बाद केले. 'इ' गटात अहमदनगर विरूद्ध बीड या मुलींच्या एकतर्फी सामन्यात अहमदनगरने बीडवर (६-२,१०-६) १६-८ असा १ डाव व ८ गुणांनी विजय प्राप्त केला. विजयी संघाच्या ॠतुजा रोकडे (२.३० मि, ३.४० मि व ४ गडी) व शिला चव्हाण (२.३० मि, १ मि व ३ गडी) चमकल्या. 'ड' गटातील सामन्यात सोलापूरच्या किशोरी संघाने परभणीचे आव्हान (१७-३,०-३)१७-६ असे १ डाव व ११ गुणांनी लीलया परतावून लावले.

मुलांमधे गतविजेत्या सोलापूरने धुळे संघाला (१४-०,०-४) १४-४ असे १ डाव व १० गुणांनी गारद करून विजयी बोहनी केली. सोलापूरच्या अजय कश्यपने ७ मिनीटे नाबाद संरक्षण केले तर रोहित गावडेने तेजतर्रार आक्रमणात ६ गडी बाद करून आपल्या तयारीची चुणूक दाखवले. 'क'गटात मुंबई उपनगरने  नंदुरबारवर (२१-६,०-७)२१-१३ अशी १ डाव व ८ गुणांनी मात केली. उपनगरच्या अजित यादवने आक्रमणात ७ गडी टिपले. 'फ' गटात अहमदनगरच्या मुलांनी जालना संघावर (१६-१,०-३)१६-४ असा १ डाव व १२ गुणांनी विजय नोंदवला. नगरच्या रेहान शेखने संघासाठी ४ गुणांची कमाई केली. 'ड' गटात सांगलीच्या किशोरांनी यजमान जळगाववर (११-३,०-५) ११-८ अशी १ डाव व ३ गुणांनी मात केली. सांगलीच्या पियुष काळेने २ मि संरक्षण केले.

Web Title: State championship and selection test kho-kho tournament: Pune, Solapur, Mumbai suburb and Sangli's winning opener

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.