नवी दिल्ली : आक्रमक खेळाच्या बळावर षटकारांची आतषबाजी सुरूच राहील, असा आश्वासक दिलासा वन डे संघाचे नेतृत्व सोडून सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा महेंद्रसिंग धोनी याने चाहत्यांना दिला आहे. जवळपास एक दशक टीम इंडियाचे नेतृत्व केल्यानंतर मागच्या आठवड्यात धोनीने कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली.
धोनीने युवराजसिंगसोबत झालेल्या ‘व्हिडीओ चॅट’मध्ये चाहत्यांना षटकारांची आतषबाजी बंद होणार नसल्याचे आश्वासन दिले. युवराजला संबोधून धोनी म्हणाला, ‘चेंडू माझ्या आटोक्यात असेल आणि शरीर साथ देत असेल, तर षटकार मारणे सुरूच राहणार! युवराजसारखे सहकारी असल्याने माझा प्रवास सुखकर झाला.’