‘साई’ आता स्पोर्ट्स इंडिया; खेळाडूंच्या दैनंदिन आहार भत्त्यातही मोठी वाढ होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 06:00 AM2018-07-05T06:00:59+5:302018-07-05T06:03:00+5:30

स्पोर्ट्स अ‍ॅॅथॉरिटी आॅफ इंडिया अर्थात साईमध्ये काही बदल होणार असून यातील सर्वात मोठा बदल म्हणजे संस्थेला मिळणारे नवे नाव. या बदलानुसार आता ‘साई’ स्पोर्ट्स इंडिया या नावाने ओळखले जाईल.

 'Sai' is now Sports India; The daily dietary allowance of players will be bigger | ‘साई’ आता स्पोर्ट्स इंडिया; खेळाडूंच्या दैनंदिन आहार भत्त्यातही मोठी वाढ होणार

‘साई’ आता स्पोर्ट्स इंडिया; खेळाडूंच्या दैनंदिन आहार भत्त्यातही मोठी वाढ होणार

Next

नवी दिल्ली : स्पोर्ट्स अ‍ॅॅथॉरिटी आॅफ इंडिया अर्थात साईमध्ये काही बदल होणार असून यातील सर्वात मोठा बदल म्हणजे संस्थेला मिळणारे नवे नाव. या बदलानुसार आता ‘साई’ स्पोर्ट्स इंडिया या नावाने ओळखले जाईल. त्याचबरोबर ‘खेळाडूंच्या दैनंदिन आहार भत्त्यातही भरघोस वाढ केली जाईल,’ अशी आनंदी घोषणा केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी बुधवारी केली.
साईअंतर्गत खेळाडूंना देण्यात येणाऱ्या दैनंदिन आहार भत्त्याची रक्कम वाढविली जाईल, असे राठोड यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
खेळाडूंना सध्या जेवणासाठी ठराविक दैनंदिन आहार भत्ता साईमार्फत दिला जातो. ही रक्कम तुटपुंजी आहे. भत्त्याची रक्कम अतिशय कमी असल्याची ओरड खेळाडूंकडून वारंवार होत असे. ही बाब लक्षात घेत राठोड यांनी दैनंदिन आहार भत्ता वाढविण्यावर भर दिला. आॅलिम्पिक रौप्य पदक विजेते या नात्याने आपण देखील या समस्येशी कधीकाळी झुंज दिली, असे राठोड यांनी सांगितले. हा निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

साई घेणार नवे रूप...
स्पोटर््स अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया लवकरच नव्या रूपात येणार आहे. संस्थेच्या कार्यपद्धतीत अनेक बदल करण्यात येणार असल्याची माहितीही राठोड यांनी दिली. ‘साई’ चे नावही बदलण्यात येणार असून ही संस्था सध्या तरी ‘स्पोर्ट्स इंडिया’ या नव्या नावाने ओळखली जाणार आहे, असे राठोड म्हणाले. (वृत्तसंस्था)

काही पदे रद्द होणार
‘स्पोर्ट्स इंडिया’संस्थेची कार्यप्रणाली आणि पदे वेगळी असतील. त्यात काही बदल करण्यात येतील तर काही पदे रद्द करण्यात येणार आहेत. रद्द करण्यात येणाºया पदांवर सध्या काही लोक कार्यरत आहेत. त्यांचा कार्यकाळ संपल्यावर त्या जागी पुन्हा भरती करण्यात येणार नाही, असे राठोड यांनी सांगितले.

Web Title:  'Sai' is now Sports India; The daily dietary allowance of players will be bigger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा