महिला टीमवरील अश्लिल ट्विटने ऋषी कपूर सोशल मीडियावर ट्रोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 10:38 AM2017-07-24T10:38:32+5:302017-07-24T10:38:32+5:30

ऋषी कपूर यांनी भारतीय महिला टीमवर अश्लिल टि्वट केलं. या ट्विटमुळेच ऋषी कपूर यांना नेटीझन्सने चांगलचं टार्गेट केलं आहे.

Rishi Kapoor troll on social media | महिला टीमवरील अश्लिल ट्विटने ऋषी कपूर सोशल मीडियावर ट्रोल

महिला टीमवरील अश्लिल ट्विटने ऋषी कपूर सोशल मीडियावर ट्रोल

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 24-  वादग्रस्त टि्वट केल्याने नेहमीच चर्चेत असणारे अभिनेते ऋषी कपूर एका नव्या टि्वटमुळे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत. ऋषी कपूर यांनी भारतीय महिला टीमवर अश्लिल टि्वट केलं. या ट्विटमुळेच ऋषी कपूर यांना नेटीझन्सने चांगलचं टार्गेट केलं आहे. अभिनेते ऋषी कपूर यांनी महिला भारतीय क्रिकेट टीमसाछी रविवारी संध्याकाळी टि्वट केलं होतं. 
"लॉर्डस ग्राऊंडवर सौरव गांगुलीने केलेली कृती पुन्हा केली जाईल याची वाट पाहत आहे. २००२ मध्ये भारताने नेटवेस्ट मालिकेतील अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत केलं होतं. तेंव्हा सौरवने केलेली कृती आठवते आहे," असं ऋषी कपूर यांनी टि्वटमध्ये म्हटलं. ऋषी कपूर यांच्या याच ट्विटवर सध्या सोशल मीडियावर टीका होते आहे.
भारताने लॉर्डस मैदानावर फायनस मॅच जिंकल्यानंतर टीम इंडियाचा तत्कालिन कर्णधार सौरव गांगुलीने अंगातील टी-शर्ट काढून जल्लोष केला होता. त्यामुळे सौरव गांगुलीवर त्यावेळी चांगलीच टीका झाली होती. महिला टीमने आयसीसी वर्ल्ड कपच्या फायनल मॅचमध्ये इंग्लंडला हरवून सौरव सारखं कृत्य करावं, असं दर्शविणारं अश्लिल टि्वट ऋषी कपूर यांनी केल्याने सोशल मीडियावर नेटीझन्सने त्यांच्यावर टीकेची झोड घेतली आहे. 
 
ट्विटरवरील लोकांच्या कमेंट पाहून ऋषी कपूर यांनीही नेटीझन्सना उत्तर दिलं आहे. माझ्या ट्विटमध्ये चुकीचं काय होत ? महिला खेळाडूने सौरव सारखं करावं, असं मी म्हंटलं नाही. सौरवने जे केलं तो शो त्याने परत करावा, असं मी म्हंटलं होतं. तुमच्या डोक्यात चुकीच्या गोष्टी आहेत. असं ट्विट करत ऋषी कपूर यांनी त्यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. 
 
आणखी वाचा
 

‘या’ कपल्सनी वेगळे झाल्यानंतरही घेतला नाही घटस्फोट!

कंगनाने ओपन लेटर लिहीत सैफला पाजले डोस!

 

 

 

 

Web Title: Rishi Kapoor troll on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.