Pro Kabaddi League 2018: Haryana Steelers opened winning acount | Pro Kabaddi League 2018 : हरयाणा स्टीलर्सने विजयाचे खाते उघडले, गुजरातची पाटी कोरीच
Pro Kabaddi League 2018 : हरयाणा स्टीलर्सने विजयाचे खाते उघडले, गुजरातची पाटी कोरीच

चेन्नई : हरयाणा स्टीलर्स संघाने प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात शुक्रवारी गुजरात फॉर्च्युनजायंट्स संघावर 32-25 असा विजय मिळवला. हरयाणाचा या पर्वातील हा पहिलाच विजय ठरला. मोनू गोयत व कुलदीप सिंग हे या विजयाचे शिल्पकार ठरले.हरयाणाचे मोनू गोयत आणि कुलदीप सिंग यांना गुजरातच्या सचिनने तोडीस तोड उत्तर दिले. शुक्रवारी झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी पहिल्या सत्रात आक्रमणावरच भर दिला. मात्र, बचावाच्या बाबतीत हरयाणाचे खेळाडू उजवे ठरले. त्याच जोरावर त्यांनी पहिल्या 30 मिनिटांत 20-13 अशी आघाडी घेतली. सहाव्या पर्वातील हरयाणाचा हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात त्यांना पुणेरी पलटण संघाकडून पराभव पत्करावा लागला होता. गुजरातला पहिल्या सामन्यात दबंग दिल्लीविरुद्ध 32-32 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते.
दुसऱ्या सत्रात सचिन आणि के प्रपांजन यांनी कडवी झुंज देताना गुजरातची पिछाडी कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्यांनी सुनील कुमारचीही चांगली साथ लाभली. मात्र थोड्या फरकाने त्यांना हा सामना गमवावा लागला.


Web Title: Pro Kabaddi League 2018: Haryana Steelers opened winning acount
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.