गाडीची काच चोरण्यापासून रोखले म्हणून ऑलिम्पिक पदकविजेत्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 09:42 AM2018-07-20T09:42:25+5:302018-07-20T09:42:54+5:30

गाडीची काच चोरण्यापासून रोखले म्हणून ऑलिम्पिक पदकविजेत्या खेळाडूची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडला. कझाकस्तानच्या 25 वर्षीय फिंगर स्केटर डेनीस टेन याला चोरांनी केलेल्या हल्ल्यात प्राण गमवावे लागले. 2014 च्या सोची ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.

olympic medalist died today after being stabbed in an attempted robbery | गाडीची काच चोरण्यापासून रोखले म्हणून ऑलिम्पिक पदकविजेत्याची हत्या

गाडीची काच चोरण्यापासून रोखले म्हणून ऑलिम्पिक पदकविजेत्याची हत्या

Next

कझाकस्तान - गाडीची काच चोरण्यापासून रोखले म्हणून ऑलिम्पिक पदकविजेत्या खेळाडूची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडला. कझाकस्तानच्या 25 वर्षीय फिंगर स्केटर डेनीस टेन याला चोरांनी केलेल्या हल्ल्यात प्राण गमवावे लागले. 2014 च्या सोची ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.
स्थानिक वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार डेनीसच्या गाडीची काच चोरणा-या दोन इसमांनी ही हत्या केली. अल्माटी येथे हा प्रकार घडला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची दोन पदक नावावर असलेल्या डेनीसला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु तीन तासांनंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. दुर्दैवाने तो आपल्यात राहिलेला नाही, अशी प्रतिक्रीया सरकारच्या प्रवक्त्याने दिली. 
अमेरिकेचा फिंगर स्केटर अॅडम रिपॉन याने ट्विट केले की, जीवावा जीव देणारा माणूस हरपला. तो माझ्यासाठी आणि अनेकांसाठी प्रेरणास्रोत होता. एक विजेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे डेनीस. 



फेब्रुवारीत पार पडलेली हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा ही त्याची तिसरी स्पर्धा होती. त्याने 2010 च्या ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले होते. त्याच्या निधनाच्या वृत्तानंतर अनेक खेळाडूंनी श्रद्धांजली अर्पण केली. 


 

Web Title: olympic medalist died today after being stabbed in an attempted robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा