आता मिशन आशियाई क्रीडा स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 03:50 AM2018-02-22T03:50:24+5:302018-02-22T03:50:40+5:30

रिओ येथे झालेल्या आॅलपिक स्पर्धेत ३ हजार मीटर स्ट्रिपलचेसमध्ये अंतिम फेरीत टॉप टेनमध्ये स्थान पटकविणारी महाराष्ट्राची ललिता बाबर

Now the mission is to compete in Asian Games | आता मिशन आशियाई क्रीडा स्पर्धा

आता मिशन आशियाई क्रीडा स्पर्धा

Next

मुंबई : रिओ येथे झालेल्या आॅलपिक स्पर्धेत ३ हजार मीटर स्ट्रिपलचेसमध्ये अंतिम फेरीत टॉप टेनमध्ये स्थान पटकविणारी महाराष्ट्राची ललिता बाबर नुकतेच आंतरराष्टÑीय खेळाडूंच्या थेट शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावर्षी राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धा होत आहेत. दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेच्या सरावासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही, मी सध्या दुखापतीतून सावरत आहे. त्यामुळे आशियाई स्पर्धा माझे मुख्य मिशन राहणार आहे, अशी माहिती ललिता बाबर हिने ‘लोकमत’ला दिली
ललिता ही एका खाजगी कार्यक्रमासाठी मुंबईत आली होती. ती म्हणाली, ‘गेल्या वर्षी माझे लग्न झाले. सरावाठी फारसा वेळ मिळाला नाही. मैदानात उतरले अन् आजारी पडले. अशा परिस्थितीत राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत सहभाग घेऊन अपेक्षित कामगिरी केली. त्यामुळे आशियाई स्पर्धेसाठी निवड झाली. स्वाभाविकच आता आत्मविश्वास वाढला आहे. मी पुढील लक्ष्य आशियाई क्रीडा स्पर्चेवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.’
‘मध्यंतरी ३ हजार स्टिपलचेस सराव करताना पाठीच्या स्नायूंना दुखापत झाली. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला १० दिवसांची विश्रांती घ्यावी लागली. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेसाठी सराव पूर्ण झाला नाही. मी सध्या पूर्णपणे फिट नसल्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे मला वाईट वाटते. आशियाई स्पर्धेत पूर्ण क्षमतेने कामगिरी करण्यासाठी राष्ट्रकुल स्पर्धेपासून दुर राहणे योग्य ठरेल. दुखापतीतून पूर्ण सावरेपर्यंत मी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी सराव सुरू करणार नाही. पूर्ण तंदूरूस्त झाल्यावर मी मार्गदर्शकांचा सल्ला घेणार आहे,’ असेही तिने सांगितले.

Web Title: Now the mission is to compete in Asian Games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.