विश्वचषक जिंकताच खेळाडूंचे ‘नग्न सेलिब्रेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 07:00 AM2018-07-26T07:00:50+5:302018-07-26T07:03:59+5:30

न्यूझीलंडच्या रग्बी सेव्हन पुरुष संघाचा प्रताप; फोटो व्हायरल

New Zealand player strips off to celebrate Rugby Sevens World Cup win | विश्वचषक जिंकताच खेळाडूंचे ‘नग्न सेलिब्रेशन’

विश्वचषक जिंकताच खेळाडूंचे ‘नग्न सेलिब्रेशन’

सॅन फ्रॅन्सिस्को : विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकल्यानंतर विजयी संघातील खेळाडूंनी सेलिब्रेशन केल्याच्या वेगवेगळ्या तऱ्हा तुम्ही पाहिल्या असतील. क्रिकेट, फुटबॉलमध्ये खेळाडू आणि संघाची सेलिब्रेशनची खास स्टाईल असते. काहीजण शर्ट काढून आनंद व्यक्त करतात, तर काहीजण मैदानात हातवारे करीत चाहत्यांना सुखावून सोडतात. काही खेळाडूंची आनंद व्यक्त करण्याची स्टाईल ट्रेडमार्क स्टाईल बनलेली असते.
न्यूझीलंडच्या रग्बी सेव्हन संघातील एका खेळाडूने विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकल्यानंतर चक्क नग्न होत सेलिब्रेशन केले. कर्ट बाकर असे या खेळाडूचे नाव असून, त्याच्या सेलिब्रेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहेत.
अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को शहरात रविवारी रग्बी विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडला. न्यूझीलंडने इंग्लंडचा ३३-१२ असा पराभव केला. यासोबतच न्यूझीलंडने रग्बी विश्वचषक लागोपाठ दुसऱ्यांदा जिंकण्याचा पराक्रम केला. विजयानंतर सहकाºयांसोबत ड्रेसिंग रूममध्ये सेलिब्रेशनदरम्यान बेफाम झालेल्या कर्टने नग्न होत फोटोसेशन केले. न्यूझीलंडच्या महिला संघानेही विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकल्यामुळे आनंद द्विगुणीत झाला होता.
बुधवारी पहाटे आॅकलंड येथे आगमन झाल्यानंतर या संघाचे कोच क्लार्क लेडलॉ यांनी मात्र आपल्या खेळाडूंचे समर्थन करीत विश्वचषक जिंकल्याचा आनंद व्यक्त केल्याचे म्हटले आहे.
संघाचा कर्णधार स्कॉट करी याने ड्रेसिंग रूममध्ये बीअर उघडून विजयाचा जल्लोष करताच बाकरने पारंपरिक आवेशात निर्वस्त्र होत या आनंदात भर घातली. विशेष असे की संघाच्या फोटोमध्येही काही खेळाडू निर्वस्त्र बसल्याचे दिसत आहे. बाकरने यावर स्पष्टीकरण देत केवळ गंमत म्हणून मी कपडे काढले. कुणाला त्रास देण्याचा माझा हेतू नव्हता. फोटोसाठी आणि सहकाºयांना आनंद देण्यासाठी मी निर्वस्त्र झालो होतो, असे म्हटले आहे. युवावस्थेपासूनच विजयाचा आनंद मी अशाप्रकारे साजरा करीत असल्याचे बाकरचे मत होते. 
 

Web Title: New Zealand player strips off to celebrate Rugby Sevens World Cup win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.