कुस्तीमध्ये आता नवीन नियम, डोपिंग प्रकरणात खेळाडूबरोबर प्रशिक्षकही ठरणार दोषी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 05:21 PM2019-05-11T17:21:52+5:302019-05-11T17:24:03+5:30

गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय कुस्तीपटू डोपिंगमध्ये आढळल्याचे पाहायला मिळाले.

New rules for wrestling, if wrestler will be trapped in the dope case then the coach will also look at the ban | कुस्तीमध्ये आता नवीन नियम, डोपिंग प्रकरणात खेळाडूबरोबर प्रशिक्षकही ठरणार दोषी

कुस्तीमध्ये आता नवीन नियम, डोपिंग प्रकरणात खेळाडूबरोबर प्रशिक्षकही ठरणार दोषी

googlenewsNext

नवी दिल्ली : जर एखादा खेळाडू डोपिंगमध्ये दोषी सापडला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येते. काही वेळेला बंदी आणि दंड भरावा लागतो, तर काही वेळा दोषी खेळाडूवर आजीवन बंदीही घालण्यात येते. पण आता मात्र यामध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. कारण यापुढे जर एखादा कुस्तीपटू डोपिंगमध्ये दोषी आढळला तर त्याच्या प्रशिक्षकांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये भारतीयकुस्तीपटू डोपिंगमध्ये आढळल्याचे पाहायला मिळाले. या खेळाडूंवर बंदीही घालण्यात आली. पण या प्रकरणांमुळे भारताच्या नावावर आंतरराष्ट्रीय स्तरावर एक ठपका बसल्याचे म्हटले गेले. त्यामुळे यापुढे जर कुस्तीपटू दोषी आढळला तर त्यासाठी प्रशिक्षकांनाही दोषी ठरवण्याचा निर्णय भारतीय कुस्ती महासंघाने घेतला आहे.

खेळाडूंच्या डोपिंगमध्ये काहीवेळा प्रशिक्षकांचाही हात असल्याचे यापूर्वी म्हटले गेले आहे. त्याचबरोबर खेळाडूची मुख्यत्वेकरून जबाबदारी ही प्रशिक्षकांची असते. त्यामुळे आपला खेळाडू नेमका काय सेवन करतो, याकडे प्रशिक्षकांनी लक्ष देणे गरजेचे असते. पण गेल्या काही वर्षांमध्ये मात्र भारतीय खेळाडू डोपिंगच्या विळख्यात अडकले गेल्याने भारतीय कुस्ती महासंघाने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

याबाबत भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी सांगितले की, " जर एखादा कुस्तीपटू राष्ट्रीय शिबीरापासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यंत डोपिंगमध्ये दोषी आढळला तर त्याचे प्रशिक्षकही दोषी ठरतील आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. जर एखादा खेळाडू प्रशिक्षकाचे ऐकत नसेल, तर त्या प्रशिक्षकांनी ही गोष्ट महासंघाला कळवायला हवी. आम्हाला ही गोष्ट कळल्यावर आम्ही त्याच्यावर उचित कारवाई करू."

Web Title: New rules for wrestling, if wrestler will be trapped in the dope case then the coach will also look at the ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.