ऑलिम्पिक विजेत्याला नमवून भारताच्या नीरजची सुवर्ण भालाफेक !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 11:11 AM2018-07-18T11:11:11+5:302018-07-18T11:11:33+5:30

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने आपल्या खात्यात आणखी एक सुवर्णपदकाची भर घातली. फ्रान्स येथील सोटेव्हिल अॅथलेटिक स्पर्धेत त्याने 85.17 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले.

Neeraj clinch another gold | ऑलिम्पिक विजेत्याला नमवून भारताच्या नीरजची सुवर्ण भालाफेक !

ऑलिम्पिक विजेत्याला नमवून भारताच्या नीरजची सुवर्ण भालाफेक !

Next

मुंबई - भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने आपल्या खात्यात आणखी एक सुवर्णपदकाची भर घातली. फ्रान्स येथील सोटेव्हिल अॅथलेटिक स्पर्धेत त्याने 85.17 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. त्याने अॅड्रीयन मार्डाने ( 81.48 मी. ) आणि एडिस मॅटसेव्हिशियस ( 79.31 मी. ) यांना पिछाडीवर टाकले. 2012 च्या लंडन ऑलिम्पिक विजेता केशॉर वॅलकॉटला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. 78.26 मीटर ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली.



नीरजने नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 86.47 मीटरसह सुवर्णपदक जिंकले होते आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा तो पहिला भारतीय भालाफेकपटू ठरला होता. 20 वर्षीय नीरजने 2016 मध्ये 20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कनिष्ठ गटातील विश्वविक्रमासह एतिहासिक सुवर्ण जिंकले होते. मात्र, रिओ ऑलिम्पिकची पात्रता निश्चित करण्यात तो अपयशी ठरला होता. फ्रान्समधील या पदकाने पुढील महिन्यात होणा-या आशियाई स्पर्धेत विक्रमी कामगिरी करण्यासाठी नीरजचे मनोबल वाढले आहे. 

Web Title: Neeraj clinch another gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा