मंदार दिवसेची पुन्हा सुवर्णमय कामगिरी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 01:01 AM2017-08-12T01:01:03+5:302017-08-12T01:01:12+5:30

अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे सुरू असलेल्या विश्व पोलीस व फायर क्रीडा स्पर्धेत मूळचा कोल्हापूरचा; पण सीमा सुरक्षा दलात अधिकारी असणाºया जलतरणपटू मंदार दिवसेने शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या जलतरण स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्य, एक कांस्यपदकाची कमाई केली.

Mandar Diwasese again gold performance | मंदार दिवसेची पुन्हा सुवर्णमय कामगिरी  

मंदार दिवसेची पुन्हा सुवर्णमय कामगिरी  

googlenewsNext

कोल्हापूर : अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे सुरू असलेल्या विश्व पोलीस व फायर क्रीडा स्पर्धेत मूळचा कोल्हापूरचा; पण सीमा सुरक्षा दलात अधिकारी असणाऱ्या  जलतरणपटू मंदार दिवसेने शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या जलतरण स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्य, एक कांस्यपदकाची कमाई केली.
मंदारने शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या ४०० मीटर व १५०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य व रिले स्पर्धेत कांस्य अशी कमाई केली. त्यांच्या खात्यात स्पर्धेतील प्रत्येकी तीन सुवर्ण, रौप्य व एक कांस्य अशी सात पदके जमा झाली आहेत. अजून त्याचे ८०० व २०० मीटर फ्री स्टाईल आणि रिले हे स्पर्धा प्रकार बाकी आहेत. त्यातूनही देशवासीयांना पदकाची अपेक्षा आहे.

Web Title: Mandar Diwasese again gold performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.