महाराष्ट्राला सर्वसाधारण उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 03:22 AM2018-02-09T03:22:18+5:302018-02-09T03:22:23+5:30

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी विविध क्रीडाप्रकारांत ३६ सुवर्ण, ३२ रौप्य आणि ४३ कांस्य अशी एकूण १११ पदके जिंकून केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या पहिल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले.

Maharashtra had to settle for the general runner-up title | महाराष्ट्राला सर्वसाधारण उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले

महाराष्ट्राला सर्वसाधारण उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले

Next

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी विविध क्रीडाप्रकारांत ३६ सुवर्ण, ३२ रौप्य आणि ४३ कांस्य अशी एकूण १११ पदके जिंकून केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या पहिल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. बुधवारी महाराष्ट्र संघ पदकतालिकेत दुस-या क्रमांकावर होता. पण, गुरुवारी शेवटच्या दिवशी झालेल्या मुष्टियुद्ध स्पर्धांमध्ये हरियाणाच्या खेळाडूंनी बाजी मारून महाराष्ट्र संघापेक्षा ३ सुवर्णपदके जास्त संपादन (३८ सुवर्ण, २६ रौप्य व ३८ कांस्य अशी एकूण १०२ पदके) करून अव्वल स्थान मिळविले.
नवी दिल्ली येथील विविध क्रीडासंकुलांमध्ये संपलेल्या या स्पर्धेत शेवटच्या दिवशी ज्यूदोमध्ये महाराष्टÑाच्या अदनन शेखने ९० किलोंवरील गटात गुजरातच्या सुत्तार शेखला इप्पोन स्कोरने (पूर्ण गुण) बाऊटची शेवटची दोन मिनिटे बाकी असताना पराभूत करून सुवर्णपदक जिंकले. मुलींच्या गटा ७० किलोंवरील गटात महाराष्टÑाच्या अपूर्वा पाटीलला हरियाणाच्या संयोगिता सिंगकडून पराभव पत्करावा लागला; त्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानवे लागले. आर्चरीमध्ये कंपाऊंड प्रकारात ईशा पवारने अचूक लक्ष्य साधून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्तापित केला. रिकर्व्ह प्रकारात सुमेध मोह्ममेदने रौप्यपदक जिंकले.
मुष्टियुद्धात महाराष्टÑाने एकूण ७ सुवर्ण व एक रौप्य पदक आपल्या नावावर केले.
बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्राच्या डावखुºया मालविका बनसोड हिने सुवर्ण पदकाला गवसणी घालताना अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्याच आकर्षी कश्यप हिला २१-१२, २१-१० असा धक्का दिला. त्याचवेळी, मुलांच्या १७ वर्षांखालील गटाच्या अंतिम फेरीत मणिपूरच्या मैसनम मैरबा याने चमकदार कमगिरी करत उत्तर प्रदेशच्या आकाश यादव याचा १६-२१, २१-१४, २१-१८ असा पराभव करत सुवर्ण पटकावले.ºिहदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये बॉल प्रकारात महाराष्टÑाच्या कृष्णा छेड्डाने ११.३५ गुण संपादन करून सुवर्णपदक, तर प्रियांका आचार्यने ११.३५ गुणांसह रौप्यपदक आपल्या नावावर केले. हूप प्रकारात महाराष्टÑाच्या अन्नया सोमनने १२.१०, तर श्रेया कुलकर्णीने ११.३५ गुण संपादन करून अनुक्रमे सुवर्ण व रौप्य जिंकले.
>उत्कृष्ट खेळाडूंचा बहुमान :
खो-खो मुले : निहार दुबळे; मुली : रेश्मा राठोड
ज्यूदो : स्नेहल कावरेलाला उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार

Web Title: Maharashtra had to settle for the general runner-up title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.