खो-खो स्पर्धा : पुरुषांमध्ये मुंबई उपनगर तर महिलांमध्ये ठाणे अजिंक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 10:15 PM2018-11-15T22:15:35+5:302018-11-15T22:17:08+5:30

पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने पुण्याचा १९-१८ (१०-०९ व ०९-०९) अतिशय अतीतटीच्या सामन्यात एक गुणाने पराभव करत अजिंक्यपदाल काबिज केले.

Kho-Kho Tournament: Thane in felame and Mumbai suburbs in male won title | खो-खो स्पर्धा : पुरुषांमध्ये मुंबई उपनगर तर महिलांमध्ये ठाणे अजिंक्य

खो-खो स्पर्धा : पुरुषांमध्ये मुंबई उपनगर तर महिलांमध्ये ठाणे अजिंक्य

Next
ठळक मुद्देपुरुषांमध्ये अक्षय भांगरे तर महिलांमध्ये प्रियंका भोपी सर्वोत्कृष्टमहिलांच्या अंतिम सामन्यात ठाण्याने रत्नागिरीवर ६-५ (६-२ व ०-३) असा एक डाव एक गुणाने विजय मिळवत अजिंक्यपद सहज मिळवले.पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने पुण्याचा १९-१८ (१०-०९ व ०९-०९) अतिशय अतीतटीच्या सामन्यात एक गुणाने पराभव करत अजिंक्यपद काबिज केले.

सांगली : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने  पुरुष – महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुरुषांमध्ये मुंबई उपनगरने पुण्याचा तर महिलांमध्ये ठाण्याने रत्नागिरीचा पराभव करत अजिंक्यपदाला गवसणी घातली.

पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने पुण्याचा १९-१८ (१०-०९ व ०९-०९) अतिशय अतीतटीच्या सामन्यात एक गुणाने पराभव करत अजिंक्यपद काबिज केले. मुंबई उपनगरच्या अक्षय भांगरेने १:३०,१:३० मि. संरक्षण करत एक  गडी बाद केला व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा मान पटकावला, हर्षद हातणकरने २:०० मि. संरक्षण केले, ऋषीकेश मुर्चावडेने १:००  मि. संरक्षण करत पाच गडी बाद केले व दुर्वेश साळुंखे १:००  मि. संरक्षण करत चार  गडी बाद केले व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आक्रमक होण्याचा मान मिळवला. पुण्याच्या अक्षय गणपुलेने १:४०, १:४० मि. संरक्षण करत एक  गडी बाद केला व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संरक्षक होण्याचा मान पटकावला, त्यांच्याच प्रतिक वाईकरने १:००, १:२० मि. संरक्षण करत चार गडी बाद केले, सुभाष लेंगरने १:१० मि. संरक्षण करत चार  गडी बाद करत  जोरदार लढत दिली मात्र अखेर ते अपयशी ठरले.

महिलांच्या अंतिम सामन्यात ठाण्याने रत्नागिरीवर ६-५ (६-२ व ०-३) असा एक डाव एक गुणाने विजय मिळवत अजिंक्यपद सहज मिळवले. ठाण्याच्या प्रियंका भोपीने पहिल्या डावात नाबाद ४:१० मि. व दुसर्‍या डावात ४:०० मि. संरक्षण करत रत्नागिरीची हवाच काढून टाकली व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा मान सुध्दा पटकावला, रूपाली बडेने २:५०, २:५० मि. संरक्षण करताना एक बळी मिळवला, रेश्मा राठोडने २:००, १:४० मि. संरक्षण करताना एक बळी मिळवला व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आक्रमक होण्याचा मान मिळवला व तेजश्री कोंडाळकरने तीन बळी मिळवत ठाण्याचे अजिंक्यपद पक्के केले. तर रत्नागिरीच्या अपेक्षा सुतारने २:१० मि. संरक्षण करताना स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संरक्षक होण्याचा मान पटकावला, ऐश्वर्या सावंतने २:०० मि. संरक्षण करताना एक बळी मिळवला, तन्वी कांबळेने १:३० मि. संरक्षण केले व जोरदार प्रतिकार केला मात्र त्या आपल्या संघाचा डावाने पराभव टाळू शकल्या नाहीत. 

Web Title: Kho-Kho Tournament: Thane in felame and Mumbai suburbs in male won title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.