खो-खो : महाराष्ट्राची मुलं-मुली हुशार; राष्ट्रीय स्पर्धेत पटकवले अजिंक्यपद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 05:03 PM2018-12-20T17:03:53+5:302018-12-20T17:05:01+5:30

सोलापूरच्या अजय कश्यपला 'भरत' तर उस्मानाबादच्या अमृता जगतापला 'ईला' पुरस्कार

Kho-Kho: Maharashtra's boys and girls are smart; won National championship | खो-खो : महाराष्ट्राची मुलं-मुली हुशार; राष्ट्रीय स्पर्धेत पटकवले अजिंक्यपद

खो-खो : महाराष्ट्राची मुलं-मुली हुशार; राष्ट्रीय स्पर्धेत पटकवले अजिंक्यपद

Next

रूद्रपूर, उत्तराखंड (दि २०) : येथे संपन्न झालेल्या २९ व्या किशोर-किशोरी (१४ वर्षाखाली) राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही अजिंक्यपद पटकावले. सब-ज्युनियर गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत दिला जाणारा किशोर गटातील 'भरत अवॉर्ड ' सोलापूरच्या अजय कश्यप ला तर किशोरी गटातील 'ईला अवॉर्ड' उस्मानाबादच्या अमृता जगतापने पटकावला.

किशोर गटातील अटीतटीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने पहिल्या डावातील दोन गुणांची पिछाडी भरून काढत अतिरिक्त डावात तेलंगणवर (५-७,६-४,६-५) १७-१६ अशी १ गुणांनी मात करून अजिंक्यपद कायम राखले. नाणेफेक तेलंगणने जिंकून  प्रथम संरक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. सामन्यातील दोन डावानंतर दोन्ही संघ ११-११ अशा समानगुणस्थितीत होते. हि कोंडी फोडण्यासाठी अलाहिदा डाव खेळवण्यात आला व या डावातील महाराष्ट्राच्या संरक्षणाच्या पाळीत प्रतिस्पर्धी संघाला सामना बरोबरीत सोडवायला एका गुणाची आवश्यक्ता असताना अजय कश्यपने नाबाद १.४० मि पळतीचा सुरेख करीत विजयश्री खेचून आणली. महाराष्ट्राच्या विवेक ब्राम्हणे (१.२० मि, १.२० मि, १.४० मि व १ गडी), सचिन पवार (१.१० मि नाबाद व ४ गडी) , रवि वसावे (१.१० मि, १.३० मि, १.३० मि व ३ गडी) व किरण वसावे (२.५० मि व २ गडी) यांचा विजयात सिंहाचा वाटा होता.

मुलींच्या अंतिम फेरीत बलाढ्य महाराष्ट्राने ओडिशाचा (७-२,०-४) ७-६ असा १ डाव व १ गुणांनी दणदणीत पराभव करून अजिंक्यपदावर नाव कोरले. महाराष्ट्राच्या अमृता जगताप (३ मि नाबाद), प्रिती काळे (२.५० मि व १ गडी), मनिषा पडेर (२.३० मि), ललिता गोबाले (३ गडी) व अर्चना व्हनमाने (१.३० मि , १ मि व ३ गडी) यांनी प्रशंसनीय कामगिरी केली.

Web Title: Kho-Kho: Maharashtra's boys and girls are smart; won National championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.