खेलो इंडिया 2019 : खो-खो मध्ये महाराष्ट्राची शानदार सलामी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 04:39 PM2019-01-13T16:39:15+5:302019-01-13T16:40:29+5:30

Khelo India 2019: महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे मुलांच्या 17 व 21 वर्षांखालील गटात दणदणीत विजय मिळवत खो-खोमध्ये झोकात सलामी केली.

Khelo India 2019: Maharashtra's team good start in Kho-Kho games | खेलो इंडिया 2019 : खो-खो मध्ये महाराष्ट्राची शानदार सलामी

खेलो इंडिया 2019 : खो-खो मध्ये महाराष्ट्राची शानदार सलामी

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे खो-खोमध्ये झोकात सलामी दिलीमहाराष्ट्राने 17 वर्षांखालील मुलांच्या एकतर्फी लढतीत गुजरातला नमवले21 वषार्खांलील गटात महाराष्ट्राने छत्तीसगढ संघाचा पराभव केला

पुणे :  महाराष्ट्रानेखेलो इंडिया 2019 मध्ये अपेक्षेप्रमाणे मुलांच्या 17 व 21 वर्षांखालील गटात दणदणीत विजय मिळवत खो-खोमध्ये झोकात सलामी केली. महाराष्ट्राने 17 वर्षांखालील मुलांच्या एकतर्फी लढतीत गुजरातला  11-9 असे दोन गुण व साडेसात मिनिटे राखून पराभव केला. त्याचे श्रेय दिलीप खांडवी (2 मि.10 सेकंद व 1 मिनिट 40 सेकंद), रोहन कोरे (2 मि,   2 मि. 20 सेकंद तसेच तीन गडी), अभिषेक शिंदे (नाबाद दीड मिनिटे व एक मिनिट 40 सेकंद) यांना द्यावे लागेल. गुजरातकडून किस्मत दाबी याने चार गडी बाद करीत एकाकी लढत दिली. 

तामिळनाडू संघाने मणिूपर संघाचा 14-11 असा एक डाव 3 गुणांनी पराभव केला. त्यामध्ये एम.गोपालकृष्ण (2 मि.50 सेकंद, 1 मि.40 सेकंद व 5 गडी), टी. गौतम (नाबाद अडीच मिनिटे, दीड मिनिटे व चार गडी) यांनी महत्त्वाचा वाटा उचलला. मणिपूरकडून एम.मनीषसिंग याने दोन मिनिट पळती व दोन गडी अशी कामगिरी करीत चांगली झुंज दिली. 

मुलांच्या 21 वषार्खांलील गटात महाराष्ट्राने छत्तीसगढ संघाचा 20-12 असा एक डाव 8 गुणांनी धुव्वा उडवला. महाराष्ट्राकडून अवधूत पाटील ( 1 मि.10 सेकंद व 1 मि.40 सेकंद, तसेच चार गडी), मिलिंद कुरपे (2 मिनिटे व चार गडी), अरुण गुणके  ( 2 मि.20 सेकंद व तीन गडी) यांनी अष्टपैलू कामगिरी केली. छत्तीसगढ संघाकडून नितीनकुमार व किशोरकुमार यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. 

मुलींच्या 17 वर्षांखालील गटात पंजाबने पश्चिम बंगाल संघावर 11-7 असा अनपेक्षित विजय नोंदवला. त्यांच्या हरमानप्रित कौर ( 4 मिनिटे व 2 मिनिटे, तसेच एक गडी), अमरीत कौर (3 मिनिटे)व रमणदीप कौर (पाच गडी) यांनी कौतुकास्पद वाटा उचलला. बंगाल संघाच्या इशिता बिस्वास (दीड मिनिटे, अडीच मिनिटे व तीन गडी) व तृष्णा बिस्वास (2 मि.40 सेकंद) यांनी दिलेली लढत निष्फळ ठरली. 
 

Web Title: Khelo India 2019: Maharashtra's team good start in Kho-Kho games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.