चांगजोउ : राष्ट्रकुलचा माजी चॅम्पियन पारुपाली कश्यप याला आज, गुरुवारी येथे झालेल्या १५0,000 डॉलर्स इनामी रक्कमेच्या चायना मास्टर्स ग्रा. प्रि. गोल्ड स्पर्धेत अत्यंत चुरशीच्या झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पराभूत होउन स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
एक तास १६ मिनिटे चाललेल्या या सामन्यात कश्यपला चीनच्या तृतीय मानांकित कियाओ बिन याच्याकडून १0-२१,२२-२0, १३-२१ असे पराभूत व्हावे लागले. जानेवारीत झालेल्या खांदेदुखीतून सावरल्यानंतर कश्यप या स्पधेतून पुनरागमन करीत होता. या स्पर्धेत हर्षल दाणी हा एकमेव भारतीय खेळाडू उरला असून तो आता उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या सन फेईजियांगशी लढणार आहे. साई उत्तेजिता आणि श्रीकृष्णा प्रिया पराभूत झाल्याने भारताची महिला एकेरीतील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे.