कुमार गट कबड्डी : सिद्धीप्रभा, दुर्गामाता, विकास, विजय उपांत्य फेरीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 05:41 PM2019-02-07T17:41:22+5:302019-02-07T17:41:37+5:30

सिद्धीप्रभा, दुर्गामाता, विकास, विजय यांनी श्री सिद्धेश्वर सेवा मंडळाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या कुमार गट "मनसे चषक" कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली.

Kabaddi: Siddhiaprabha, Durgamata, Vikas, Vijay in the semi-finals | कुमार गट कबड्डी : सिद्धीप्रभा, दुर्गामाता, विकास, विजय उपांत्य फेरीत दाखल

कुमार गट कबड्डी : सिद्धीप्रभा, दुर्गामाता, विकास, विजय उपांत्य फेरीत दाखल

Next

मुंबई : सिद्धीप्रभा, दुर्गामाता, विकास, विजय यांनी श्री सिद्धेश्वर सेवा मंडळाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या कुमार गट "मनसे चषक" कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. सिद्धीप्रभा विरुद्ध दुर्गामाता, विकास विरुद्ध विजय अशा उपांत्य लढती होतील. मुंबई शहर कबड्डी असो.च्या मान्यतेने प्रभादेवी-राजाभाऊ साळवी उद्यानातील स्व.किरण मूनणकर क्रीडांगणावर सुरू असलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या सामन्यात सिद्धीप्रभाने जय दत्तगुरुला ५३-५०असे चकवित उपांत्य फेरी गाठली. शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत चुरशीनं खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुणफलक सतत दोन्ही बाजूला झुकत होता. सिद्धीप्रभाने पहिला लोण देत आघाडी घेतली. लगेचच दत्तगुरुने याची परतफेड करीत ही आघाडी कमी केली. पुन्हा एक लोण देत सिद्धीप्रभाने आपली आघाडी शाबूत ठेवली.मध्यांतराला सिद्धीप्रभाने ३०-२५ अशी आघाडी आपल्याकडे राखली होती.

उत्तरार्धात सामन्यातील चुरस आणखीनच वाढली. दत्तगुरुने या सत्रात लोण देत सामन्यात रंगत आणली.शेवटची ५मिनिटे पुकारली तेव्हा ४४-४२अशी आघाडी सिद्धीप्रभाकडे होती. शेवटच्या काही मिनिटात सामना बरोबरीत होता. पण सिद्धीप्रभाने लोण देत हा सामना आपल्या बाजूने झुकविला. या सामन्यात सिद्धीप्रभाने ३लोण व १बोनस गुण घेतले, तर दत्तगुरुने २लोण व १०बोनस गुण मिळविले. विवेक मोरे, ओमकार ढवळे यांच्या चढाया, तर मिलिंद पवारच्या भक्कम पकडी सिद्धीप्रभाच्या विजयात महत्वपूर्ण ठरल्या. सिद्धांत बोरकर, मोनू कांदू, आकाश उपाध्याय यांचा चतुरस्त्र खेळ दत्तगुरूंचा पराभव टाळण्यास पुरेसा नव्हता.

दुसऱ्या सामन्यात दुर्गामाताने अमरहिंदचा ४४-१९असा धुव्वा उडविला. विश्रांतीला २५-०६अशी आघाडी घेणाऱ्या दुर्गामाताने नंतर मात्र संथ खेळ करीत सामना आपल्या खिशात टाकला. प्रथमेश पालांडे, अमित माने दुर्गामाताकडून तर सिद्धेश सातार्डेकर, तेजस राणे अमरहिंदकडून उत्कृष्ट खेळले. विकासाने गोलफादेवी ६५-२३असे नमवित आगेकूच केली. पहिल्या डावात ३६-१६अशी विकासाकडे आघाडी होती. नंतर मात्र गोलफादेवीने नांगी टाकली. अवधूत शिंदे, अजित पाटील विकासाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. गोलफादेवीचा शिवम मिश्रा बरा खेळला.

शेवटच्या सामन्यात विजय क्लबने एस एस जी चा ३६- ०५असा पाडाव करीत उपांत्य फेरी गाठली. मध्यांतराला २४-०४अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या विजयने उत्तरार्धात देखील तोच जोश कायम राखत  हा विजय सहज साकारला.रोशन थापा, सुधीर सिंग यांच्या झंजावाती खेळाने विजयने हा विजय सहज साकारला.  

Web Title: Kabaddi: Siddhiaprabha, Durgamata, Vikas, Vijay in the semi-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kabaddiकबड्डी