कबड्डी : एअर इंडियाचा विजयी वारू मुंबई बंदरने साखळी सामन्यात रोखला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 04:39 PM2019-03-04T16:39:38+5:302019-03-04T16:41:06+5:30

अ गटात महिंद्राने न्यू इंडिया इन्शुरन्सला ३७-१४असे पराभूत करीत गटजेतेपद मिळविले.

Kabaddi: Mumbai Bandar win over Air-India in the league match | कबड्डी : एअर इंडियाचा विजयी वारू मुंबई बंदरने साखळी सामन्यात रोखला

कबड्डी : एअर इंडियाचा विजयी वारू मुंबई बंदरने साखळी सामन्यात रोखला

googlenewsNext

मुंबई : महिंद्रा, न्यू इंडिया इन्शुरन्स, मुंबई बंदर, एअर इंडिया, देना बँक, युनियन बँक, मध्य रेल्वे, जे.जे. हॉस्पीटल, मुंबई पोलीस, बी. ई. जी. यांनी मुंबई शहर कबड्डी असो. व मुंबई महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या "मुंबई महापौर चषक" कबड्डी स्पर्धेच्या व्यावसायिक पुरुष गटाच्या बाद फेरीत प्रवेश केला. महात्मा गांधी स्पोर्ट्स, सुवर्णयुग स्पोर्ट्स  ,शिवशक्ती महिला,स्वराज्य, राजमाता जिजाऊ,शिवतेज मंडळ,जय हनुमान मंडळ, डॉ. शिरोडकर यांनी महिलांत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अंदाज वर्तविल्याप्रमाणे मुंबई बंदर संघाने एअर इंडियाचा विजयी वारू रोखत आपली ताकद दाखवून दिली.

ना.म.जोशी मार्ग,मुंबई येथील श्रमिक जिमखाना येथे सुरू झालेल्या महापौर चषक कबड्डी स्पर्धेचा आज दुसरा दिवस. आज या स्पर्धेत मुंबई बंदरने धक्कादायक निकाल नोंदविला. पुरुषांच्या ब गटात मुंबई बंदरने एअर इंडियाला २७-२२असे नमवित या गटात प्रथम क्रमांक पटकावला. स्मिथिल पाटील, किरण मगर, आशिष मोहिते या विजयाचे शिल्पकार ठरले. या अगोदर झालेल्या सामन्यात सेंट्रल बँकेला २०-०७ असे पराभूत करणाऱ्या एअर इंडियाचे विमान मुंबई बंदरकडून झालेल्या या पराभवाने जमिनीवर आले. मुंबई पोलीस संघाने ई गटात ठाणे पोलीस संघाचा २०-०९असा पाडाव केला. मध्यांतराला १३-०७अशी आघाडी घेणाऱ्या मुंबईने नंतर संथ खेळ करीत हा विजय साकारला. दुसऱ्या सामन्यात मुंबई पोलिसांनी पुण्याच्या बी.ई. जी. ला ३८-३७असे चकवित या गटात अग्रक्रम पटकाविला. विश्रांतीपर्यंत १३-२०असे ७गुणांनी पिछाडीवर पडलेल्या मुंबई पोलीस संघांनी विश्रांतीनंतर टॉप गियर टाकत हा विजय साकारला. संकेत धुमाळ, सचिन मिसाळ, रितेश साटम या विजयाचे शिल्पकार ठरले. बी.ई. जी.च्या प्रवीण जगन, रोहित मांजरे यांचा खेळ उत्तरार्धात बहरला नाही.


अ गटात महिंद्राने न्यू इंडिया इन्शुरन्सला ३७-१४असे पराभूत करीत गटजेतेपद मिळविले.अनंत पाटील, सुहास वाघेरे,अक्षय बेर्डे, शेखर तटकरे यांचा चतुरस्त्र खेळ या विजयात चमकदार झाला. ड गटात मध्य रेल्वेने रिझर्व बँकेवर ३५-१९अशी मात करीत या गटात सर्व विजय प्राप्त केले.रोहित पार्टे,सुनील शिवतरकर,सूरज बनसोडे, गणेश बोडके यांनी आक्रमक खेळ करीत पहिल्या डावात १९-०९अशी आघाडी घेत विजयाचा पाया रचला. बँकेकडून साहिल राणे, प्रफुल्ल कदम बरे खेळले. याच गटात जे. जे. हॉस्पीटलने देखील रिजर्व बँकेवर ३५-३३असा विजय मिळविला.या दुसऱ्या पराभवामुळे बँकेवर साखळीतच गारद होण्याची वेळ आली.प्रफुल्ल कदम, सिद्धेश सातार्डेकर यांनी चतुरस्त्र खेळ करीत रिजर्व बँकेला विश्रांतीला १७-१५अशी नाममात्र आघाडी मिळवून दिली होती. पण जे.जे.च्या प्रफुल्ल कोळी, कल्पेश सातमकर,करणं गजणे यांनी विश्रांती नंतर आपल्या खेळाची गती वाढवीत २गुणांनी संघाला बाद फेरी गाठून दिली.

महिलांच्या अ गटात महात्मा गांघी स्पोर्ट्सने अमरहिंदला ३६-१५असे धुऊन काढले. मध्यांतराला १८-०९अशी आघाडी घेणाऱ्या महात्मा गांधीने उत्तरार्धात देखील त्याच जोशाने खेळ करीत मोठ्या फरकाने हा विजय साकारला.सायली जाधव,मीनल जाधव,तेजस्वी पाटेकर महात्मा गांधींच्या या विजयात चमकल्या.अमरहिंदची श्रद्धा कदम एकाकी लढली.ब गटात शिवशक्तीने स्वराज्यला ५४-१४असे बुकलत या गटात सर्व विजयाची नोंद केली. मध्यांतराला २८-०५अशी आघाडी घेणाऱ्या शिवशक्तीला उत्तरार्धात देखील फारसा प्रतिकार झाला नाही. सोनाली शिंगटे,पूजा यादव,रेखा सावंत, रक्षा नारकर यांचा झंजावात रोखण्यास स्वराज्यकडे उत्तरच नव्हते. स्वराज्यची अंजली रोकडे बरी खेळली. ड गटात जय हनुमान संघाने संघर्ष स्पोर्ट्सला ३९-१९ असे नमवित या गटाचे जेतेपद मिळविले. पहिल्या डावात २३-०८अशी आघाडी घेणाऱ्या जय हनुमानने उत्तरार्धात सावध खेळ करीत हा विजय साकारला. पूजा पाटील, मृणाल टोपणे, आसावरी खोचरे यांचा खेळ या विजयात महत्वाचा ठरला. संघर्षची प्रणाली नागदेवते एकाकी लढली.

Web Title: Kabaddi: Mumbai Bandar win over Air-India in the league match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.