कबड्डी : भारतीय रेल्वेला राष्ट्रीय पुरुष गट स्पर्धेचे जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 08:10 PM2019-02-01T20:10:48+5:302019-02-01T20:11:11+5:30

रेल्वेचे हे या स्पर्धेतील २२वे जेतेपद.

Kabaddi: Indian Railways won the National Men's Championship title | कबड्डी : भारतीय रेल्वेला राष्ट्रीय पुरुष गट स्पर्धेचे जेतेपद

कबड्डी : भारतीय रेल्वेला राष्ट्रीय पुरुष गट स्पर्धेचे जेतेपद

Next

मुंबई : भारतीय रेल्वेने सेनादलाचा ४१-१७असा धुव्वा उडवित "६६व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या" चषकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेतील त्यांचे हे २२वे जेतेपद. ४वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ५व्या वर्षी त्यांना हे यश लाभले. या अगोदर मंडया-कर्नाटक येथे २०१३ साली झालेल्या स्पर्धेत त्यांनी सेनादलालाच पराभूत करीत शेवटचे जेतेपद मिळविले होते. 

    रोहा,म्हाडा कॉलिनीतील द. ग. तटकरे क्रीडानगरीत झालेल्या अंतिम सामना प्रो-कबड्डीत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या पवन शेरावतने आपल्या झंजावाती चढायांनी. तर गतवर्षी आपल्या अभेद्य बचावाने सर्वाधिक पकडीचे गुण मिळविणाऱ्या रविंदर बहलने आपल्या पकडीच्या खेळणे गाजविला. पहिल्याच चढाईत रेल्वेने मोनू गोयतची पकड करीत सेनादलाला इशारा दिला.नंतर सलग गुण घेत आपली आघाडी ३-०अशी वाढविली. सेनादलाने पवनची पकड करीत पहिल्या गुण घेतला. १५व्या मिनिटाला सेनादलावर लोण देत रेल्वेने १७-०९अशी आघाडी घेतली. मध्यांतराला २७-१३अशी आघाडी रेल्वेकडे होती. मध्यांतरानंतर ९व्या मिनिटाला लोण देत रेल्वेने २७-१३अशी आपली आघाडी वाढविली. या नंतर सेनादलाचा प्रतिकार मावळला. तीस ते पस्तीस हजाराच्या प्रचंड संख्येने सामना पहाण्यासाठी गर्दी करून उपस्थित कबड्डीरसिकांना या एकतर्फी सामन्याने निराश केले. या एकतर्फी सामन्यामुळे मध्यांतरानंतर त्यांनी हळूहळू काढता पाय घेण्यास सुरुवात केले.

     रेल्वेच्या या विजयात पवन शेरावत यांनी १९चढाया करीत १बोनस गुणासह ७झटापटीचे गुण घेतले.पण ६वेळा त्याची पकड झाली. दिपकने देखील आपल्या १५चढायात ५गुण घेतले, तर ३वेळा त्याची पकड झाली. रविंदर बहल यांनी ७पकडी करीत,तर दीपक आणि धर्मेश या मधरक्षक जोडगळीने एकत्रित ३पकडी करीत या विजयात  मोलाची भूमिका बजावली. सेनादलाच्या या पराभवास कारणीभूत ठरला तो मोनू गोयतचा हरविलेला सूर. यंदाच्या हंगामात सर्वाधिक बोली लागलेला मोनू प्रो-कबड्डीत देखील अपयशी ठरला होता. या स्पर्धेत देखील त्याचा खेळ बहरला नाही. या सामन्यात त्याने १३चढाया केल्या. त्यात त्याने अवघा १बोनस गुण मिळविला. तर ९वेळा तो पकडला गेला. यात तो दोन वेळा स्वयंचित (सेल्फ आउट) झाला. नितेशकुमार, जयदीप यांनी ३-३पकडी करीत थोडाफार प्रतिकार केला. पण विजयासाठी तो पुरेसा नव्हता.

   या अगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात सेनादलाने हरियाणाचा ५२-३८ असा ,तर रेल्वेने यजमान महाराष्ट्राचा ४७-२०असा पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली.महाराष्ट्र आपले विजेतेपद राखेल अशी आस लावून प्रचंड संख्येने गर्दी करून सामना पहाण्यास आलेल्या क्रीडारसिकाचा महाराष्ट्राच्या या पराभवाने हिरमोड झाला. त्यातच अंतिम सामना देखील रटाळ झाल्याने त्यांनी काढता पाय घेण्यास सुरुवात केली. 

Web Title: Kabaddi: Indian Railways won the National Men's Championship title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.