कनिष्ठ नेमबाजांची रौप्यक्रांती, पुरुषांच्या स्कीट प्रकारात पदक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 12:35 PM2018-09-11T12:35:23+5:302018-09-11T12:35:38+5:30

येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या खेळाडूंनी मंगळवारी पुरुषांच्या सांघिक स्कीट प्रकारात रौप्य, तर वैयक्तिक प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.

ISSF Shooting World Championships indian player won silver in jr. skeet | कनिष्ठ नेमबाजांची रौप्यक्रांती, पुरुषांच्या स्कीट प्रकारात पदक

कनिष्ठ नेमबाजांची रौप्यक्रांती, पुरुषांच्या स्कीट प्रकारात पदक

चँगवॉनः येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या खेळाडूंनी मंगळवारी पुरुषांच्या सांघिक स्कीट प्रकारात रौप्य, तर वैयक्तिक प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.  भारताच्या खात्यात 7 सुवर्ण, 8 रौप्य आणि 7 कांस्य अशी एकूण 22 पदके जमा झाली आहेत.

सांघिक स्कीट प्रकारात गुरनिहाल सिंग गर्चा, आयुष रुद्रराजू आणि अनंत जीत सिंग यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने 355 गुणांसह रौप्यपदक नावावर केले. या गटात चेक प्रजासत्ताकने ( 356) अवघ्या एका गुणाच्या फरकाने सुवर्णपदक जिंकले, तर इटलीला 354 गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. 



वैयक्तिक गटात गुरनिहालला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने 46 गुणांची कमाई केली. या गटात इटलीच्या एलिया स्ड्य्रूचिओली ( 55) आणि अमेरिकेच्या निक मोश्केटीने (54) अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले. 


 

Web Title: ISSF Shooting World Championships indian player won silver in jr. skeet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.