VIDEO: सुवर्णपदक मिळवूनही इस्रायली राष्ट्रगीत वाजवलेच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 03:12 PM2017-10-28T15:12:24+5:302017-10-28T15:26:55+5:30

खेळ म्हटलं की तिथे वंश, धर्म, भाषा, देश असे कोणतेही भेद करणे अपेक्षित नसतं. पण अबुधाबीने मात्र इस्रायली खेळाडू जिंकल्यावर त्याच्या देशाचे राष्ट्रगीत वाजवण्यास नकार दिला, तसेच इस्रायलचा राष्ट्रध्वजही फडकावला गेला नाही.

Israeli Athlete Wins Gold Medal but UAE Organizers Refused to Play national anthem | VIDEO: सुवर्णपदक मिळवूनही इस्रायली राष्ट्रगीत वाजवलेच नाही

VIDEO: सुवर्णपदक मिळवूनही इस्रायली राष्ट्रगीत वाजवलेच नाही

Next

अबुधाबी- खेळ म्हटलं की तिथे वंश, धर्म, भाषा, देश असे कोणतेही भेद करणे अपेक्षित नसतं. पण अबुधाबीने मात्र इस्रायली खेळाडू जिंकल्यावर त्याच्या देशाचे राष्ट्रगीत वाजवण्यास नकार दिला, तसेच इस्रायलचा राष्ट्रध्वजही फडकावला गेला नाही. 

ताल फ्लिकर हा इस्रायली खेळाडू मध्यम वजनी गटामध्ये ज्युडो खेळात सुवर्णपदक जिंकल्यावर विजेत्या खेळाडूच्या जागेवर जाऊन उभा राहिला. पण त्याच्या सन्मानार्थ 'हकित्वा' हे इस्रायलचे पारंपरिक राष्ट्रगीत वाजवण्याऐवजी इंटरनँशनल ज्युडो फेडरेशनचे गीत वाजवले गेले, आणि इस्रायलच्या झेंड्यांऐवजी फेडरेशनचा लोगो फडकावण्यात आला.


संयुक्त अरब अमिरातीच्या या रडीच्या डावामुळे न संतापता फ्लिकरने हकित्वाच म्हणणेच पसंत केले. याबाबत बोलताना तो म्हणाला, "इस्रायल हा माझा देश आहे आणि माझ्या देशाचा मला अभिमान आहे. मी हकित्वाच म्हटलं कारण तेच माझं राष्ट्रगीत आहे, त्याशिवाय मला काहीही माहिती नाही'.  'आम्ही कोठून आलोय हे सर्वांना माहिती आहे याचा अर्थ आम्ही इस्रायली आहोत हे जाहीर आहे, ध्वज फडकावला नाही तरी ते लपून राहणार नाही. इस्रायली असल्याचा मला अभिमान आहे. राष्ट्रध्वजासह अथवा राष्ट्रध्वजाविना मी खेळेन आणि प्रतिस्पर्ध्याला हरवून सर्वोच्च स्थान पटकावेन', असं फ्लिकर बोलला आहे.   

मध्यपुर्वेतील देशांनी अजूनही इस्रायलला मान्यता दिलेली नाही तसेच यूएईसारख्या अनेक देशांचे इस्रायलशी मुत्सद्दी पातळीवर संबंधही नाहीत. फ्लिकरप्रमाणे इस्रायली खेळाडू गिली कोहेनने ब्राँझपदक पटकावल्यावरही इस्रायलचा ध्वज फडकावला गेला नाही व हकित्वा वाजवले गेले नाही. इस्रायलच्या सर्व ११ खेळाडूंना राष्ट्रचिन्हे दिसणार नाहीत असे कपडे घालावे लागतील अशी 'व्यवस्था' करण्यात आली होती.
 

१९७२ चे म्युनिक ऑलिम्पिक प्रकरण
ऑलिम्पिकमध्ये सर्व जगातील खेळाडूंनी एकत्र येऊन केवळ खिलाडूवृत्तीने खेळणे अपेक्षित असते किंबहुना आँलिम्पिकचे तेच मूळतत्त्व आहे. मात्र पँलेस्टाइनने तेथेही दहशतवाद आणला होता १९७२ साली म्युनिक आँलिम्पिकमध्ये दहशतवाद्यांना घुसवून इस्रायली खेळाडूंना ओलीस ठेवण्यात आले नंतर विमानतळावर नेऊन सर्व खेळाडूंचू निर्घृण हत्या दहशतवाद्यांनी केली होती.

Web Title: Israeli Athlete Wins Gold Medal but UAE Organizers Refused to Play national anthem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.