पेनचॅक सिलॅट संघाला बसला आयओएचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 04:48 AM2018-07-18T04:48:00+5:302018-07-18T04:48:08+5:30

भारतीय आॅलिम्पिक महासंघाने (आयओए) मंगळवारी आगामी आशियाई स्पर्धेच्या पेनचॅक सिलॅट संघाला खोटे कागदपत्र सादर केल्याच्या कथित प्रकरणी वगळले आहे.

Iowa's push to Penchak Silat's team | पेनचॅक सिलॅट संघाला बसला आयओएचा धक्का

पेनचॅक सिलॅट संघाला बसला आयओएचा धक्का

Next

नवी दिल्ली : भारतीय आॅलिम्पिक महासंघाने (आयओए) मंगळवारी आगामी आशियाई स्पर्धेच्या पेनचॅक सिलॅट संघाला खोटे कागदपत्र सादर केल्याच्या कथित प्रकरणी वगळले आहे. त्यानंतर राष्ट्रीय महासंघाने कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली आहे.
आयओएने ५ जुलै रोजी आशियाई स्पर्धेसाठी ५२४ खेळाडूंची यादी जाहीर केली होती. त्यात पेनसाक सिलाटच्या २२ खेळाडूंच्या नावाचा समावेश होता, पण आयओएने केवळ दोन सदस्यांना मान्यता दिली आहे. आशियाई स्पर्धेचे आयोजन इंडोनेशियातील दोन शहर जकार्ता व पालेमबँगमध्ये १८ आॅगस्टपासून होणार आहे.
भारतीय पेनचॅक सिलॅट महासंघ (आयपीएसएफ) या निर्णयाने नाराज आहे. मान्यता मिळालेले दोन खेळाडू व उर्वरित २० खेळाडूंना सारखेच प्रमाणपत्र दिले होते, असे आयपीएसएफने म्हटले. आयपीएसएफचे सचिव मुफ्ती हामिद यासिन म्हणाले, ‘आयओएच्या अधिकाऱ्यांसह चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितले की, आशियाई स्पर्धेसाठी तुमच्या केवळ दोन महिला खेळाडूंना पाठविण्यास मंजुरी देत आहोत.’
यासिन पुढे म्हणाले, ‘आयओएने आम्हाला सांगितले, आयपीएसएफने दिलेले प्रमाणपत्र खरे नाहीत. पण, निवड झालेल्या दोन खेळाडूंचे प्रमाणपत्रही अन्य खेळाडू सहभागी झाले त्याच चॅम्पियनशिपचे आहेत.’
आयपीएसएफने म्हटले की, आम्ही आयओएकडे स्पष्टीकरण मागितले, पण अद्याप स्पष्ट उत्तर मिळालेले नाही. महासंघाचे एक अधिकारी म्हणाले, ‘आम्ही कायदेशीर कारवाईबाबत विचार करीत आहोत. आमचे खेळाडू पदकाचे दावेदार आहेत. त्यांनी या खेळात कामगिरीत सातत्य राखले आहे.’ 

Web Title: Iowa's push to Penchak Silat's team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.