भारताच्या 16 वर्षीय नेमबाज सौरभ चौधरीची विश्वविक्रमासह सुवर्ण कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 09:18 AM2018-09-06T09:18:21+5:302018-09-06T09:27:46+5:30

भारताचा 16 वर्षीय नेमबाज सौरभ चौधरीने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या 10 मीटर एअर पिस्तुल कनिष्ठ मुले गटात विश्वविक्रमाची नोंद करताना सुवर्णपदक जिंकले. त्याने 245.5 गुणांची कमाई करताना हा विश्वविक्रम नोंदवला.

India's 16-year-old shooter Saurabh Chaudhary broke his own World Record and won gold | भारताच्या 16 वर्षीय नेमबाज सौरभ चौधरीची विश्वविक्रमासह सुवर्ण कामगिरी

भारताच्या 16 वर्षीय नेमबाज सौरभ चौधरीची विश्वविक्रमासह सुवर्ण कामगिरी

Next

चँगवॉन - भारताचा 16 वर्षीय नेमबाज सौरभ चौधरीने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या 10 मीटर एअर पिस्तुल कनिष्ठ मुले गटात विश्वविक्रमाची नोंद करताना सुवर्णपदक जिंकले. त्याने 245.5 गुणांची कमाई करताना हा विश्वविक्रम नोंदवला. याच गटात भारताच्या अर्जुन सिंग चिमाने ( 218) कांस्यपदक जिंकले. कोरियाच्या होजीन लिमला ( 243.1) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 



जकार्ता येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत सौरभवने 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती त्याने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत केली. त्याने जर्मनी येथे झालेल्या कनिष्ठ मुलांच्या विश्वचषक स्पर्धेत बाजी मारताना विश्वविक्रम केला होता आणि तोच विक्रम त्याने गुरूवारी मोडला. 



Web Title: India's 16-year-old shooter Saurabh Chaudhary broke his own World Record and won gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.