Indian shooter Manu Bhakre and Saurabh Chaudhary creat World record | नेमबाज मनू भाकेर व सौरभ चौधरी यांचा विश्वविक्रम
नेमबाज मनू भाकेर व सौरभ चौधरी यांचा विश्वविक्रम

मुंबईः भारताचा युवा नेमबाज सौरभ चौधरीने शानदार कामगिरी कायम राखून आशियाई एअरगन चॅम्पियनशिप स्पर्धेत गुरुवारी दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले होते. सातत्यपूर्ण कामगिरी करताना त्याने शुक्रवारी भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली. त्याने मनू भाकेरसह 10 मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक ( कनिष्ठ) प्रकारात विश्वविक्रमासह सुवर्णवेध घेतला. त्यांनी 485.4 गुणांची कमाई करताना कनिष्ठ गटात विश्वविक्रमाची नोंद केली.  Web Title: Indian shooter Manu Bhakre and Saurabh Chaudhary creat World record
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.