भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांना केले निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 07:38 AM2019-01-10T07:38:42+5:302019-01-10T07:39:17+5:30

भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग याना २०१८ मधील संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे निलंबित केले.

Indian hockey team coach Harendra Singh suspended | भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांना केले निलंबित

भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांना केले निलंबित

Next

नवी दिल्ली : भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग याना २०१८ मधील संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे निलंबित केले. मात्र हॉकी महासंघाने त्यांना ज्युनियर संघाची जबाबदारी सांभाळण्याचा प्रस्ताव दिला आहे. भारतीय हॉकी प्रशिक्षकपदासाठी सातत्याने बदल होत आहेत. मे २०१८ मध्ये या पदावर हरेंद्र सिंग यांची नियुक्ती झाली होती.

हॉकी इंडियाने म्हटले की, ‘हे वर्ष भारतीय हॉकीसाठी निराशाजनक राहिले. यंदा अपेक्षेप्रमाणे संघाची कामगिरी झाली नाही. त्यामुळे कनिष्ठ स्तरावर जास्त लक्ष देण्याची गरज आहे.’ ज्युनियर विश्वचषक विजेत्या संघाच्या प्रशिक्षकांनी राष्ट्रकुल स्पर्धेतील भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर वरिष्ठ संघाची जबाबदारी स्विकारली होती.
 

Web Title: Indian hockey team coach Harendra Singh suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hockeyहॉकी