मी 100 टक्के फिट असेन तर कोणीही मला हरवू शकत नाही - मेरी कोम

By ऑनलाइन लोकमत on Fri, November 10, 2017 5:00pm

भारताची अव्वल महिला बॉक्सर एम. सी. मेरी कोमने नुकत्याच व्हिएतनाम येथे झालेल्या आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.

नवी दिल्ली - भारताची अव्वल महिला बॉक्सर एम. सी. मेरी कोमने नुकत्याच व्हिएतनाम येथे झालेल्या आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. वयाच्या 34 व्या बॉक्सिंग रिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणे निश्चितच सोपे नाही. मागच्यावर्षी ब्राझीलमध्ये झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अपात्र ठरल्यानंतरही उमेद न हरता मेरी कोमने आपला सराव सुरु ठेवला. अखेर आशियाई स्पर्धेच्या निमित्ताने तिने सुवर्णपंच लगावून आपल्या टीकाकारांना चोख उत्तर दिले.

कुठल्याही खेळामध्ये पुनरागमन करणे अनेकांना कठिण वाटते आणि तसे ते कठिणही असते पण प्रामाणिकपणे बॉक्सिंग रिंगमध्ये पुनरागमन मला तितके कठिण वाटले नाही. मी करीयरमधली बरीचवर्ष 48 किलो वजनी गटात खेळली आहे. तयारी चांगली असेल तर अडचणी येणार नाहीत याची मला कल्पना होती असे एम. सी. मेरी कोमने सांगितले. 

मी तीन वर्ष बॉक्सिंगपासून दूर होते. पण या काळात दररोज सकाळी किंवा संध्याकाळी कमीत कमी 45 मिनिट बॉक्सिंगचा न चुकता सराव करायचे असे मेरी कोमने सांगितले. सरावाबरोबर या काळात माझ्यावर बॉक्सिंग अॅकेडमी आणि अॅथलिटीस कमिशनची सदस्य म्हणूनही जबाबदारी होती. हे सर्व करत असताना बॉक्सिंगचा विचारही सतत माझ्या डोक्यात असायचा. 

मी माझे प्रशिक्षण थांबवले नाही. स्पर्धा जवळ आल्यानंतर मी माझ्या सरावाची वेळही वाढवली. मी माझा फिटनेस कायम ठेवला तर कोणीही मला पराभूत करु शकत नाही असे मेरी कोमने सांगितले. मेरी कोमने बॉक्सिंगमध्ये पाचवेळा विश्वविजेतेपद पटकावले आहे. मेरी कोम हिचे  पाचवे आणि 48 किल वजनी गटातील पहिले सुवर्णपदक आहे. 48 किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मेरी कोम हिने उत्तर कोरियाच्या किम ह्यांग मी हिच्यावर मात केली. 

रियो ऑलिम्पिकसाठीची पात्रता मिळवण्यात  मेरीला अपयश आले होते. त्यानंतर बऱ्याच काळानंतर मेरी कोम हिने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. राज्यसभा सदस्य, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती ३५ वर्षीय मेरी कोम पाच वर्षे ५१ किलो वजनगटात सहभागी झाल्यानंतर ४८ किलो वजनगटात परतली. 

संबंधित

आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्या बॉक्सरवर कुल्फी विकण्याची वेळ
विराट कोहलीपेक्षा 22 पट 'त्याने' एकाचवेळी कमावले
Video : दहा फुटाची रिंग ओलांडून त्याने प्रेक्षकांसोबत केली फ्री स्टाईल फाईट 
बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा : अकोल्याच्या गोपाल, अनंता, साद, हरिवंश, रोहणचा दमदार विजय
रिक्षाचालकाच्या मुलीची सुवर्णपदकाला गवसणी; टोमणे मारणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून बॉक्सिंग खेळली... जिंकली!

अन्य क्रीडा कडून आणखी

राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपउपांत्य फेरीत
महिला बॉक्सिंगमध्ये खूप सुधारणा झाली, पण खेळाडूंचे काय? ‘सुपरमॉम’ मेरीकोमचा प्रश्न
पेसची माघार हा मोठा मुद्दा नव्हता
आदिवासी समाजाच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे ध्येय - नागेश्वर राव
जळगावांत गुरुवारपासून रंगणार किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

आणखी वाचा