यजमान भारताची दहा पदके निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 04:43 AM2019-05-21T04:43:48+5:302019-05-21T04:43:54+5:30

इंडियन ओपन मुष्टीयुद्ध : उपांत्य फेरीत मेरीकोमविरुद्ध निकहत झरीन लढण्याची शक्यता

The host of India has confirmed ten medals | यजमान भारताची दहा पदके निश्चित

यजमान भारताची दहा पदके निश्चित

Next

गुवाहाटी : सहावेळा विश्वचॅम्पियन राहिलेली‘ सुपरमॉम’ एमसी मेरीकोम सोमवारी सुरू झालेल्या इंडियन ओपन मुष्टियुद्ध स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राच्या उपांत्य फेरीत (५१ किलो) आशियाई स्पर्धेचे कांस्य विजेती निकहत झरीन हिच्याविरुद्ध खेळण्याची शक्यता आहे. रविवारी जाहीर झालेल्या ड्रॉनुसार आशियाई क्रीडा स्पर्धेचा सुवर्ण विजेता अमित पंघाल (५२ किलो) हा सहजरीत्या अंतिम फेरीत स्थान मिळवेल.


ड्रॉमध्ये खेळाडूंची संख्या कमी असल्याने भारताच्या दहा खेळाडूंना थेट उपांत्य फेरीमध्ये स्थान मिळाले. त्यात पुरुष गटात सहा, तर महिला गटात चार मुष्टियोद्धांचा समावेश आहे. बृजेश यादव आणि संजय हे ८१ किलो गटात सलामीचा सामना खेळतील. नमन तंवर आणि संजीत हे मात्र ९१ किलो गटात लढतीसाठी रिंगणात उतरणार आहेत.


महिलांमध्ये लोलिना बोरगोहेन व अंजली यांनी ६९ किलो गटाच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले असून भाग्यवती काछरी आणि स्वीटी बुरा यांना ७५ किलो गटात थेट उपांत्य सामना खेळतील.


५७ किलो वजनी गटात मनीषा मौनने फिलीपाइन्सच्या नेश्ती अलकायडे पेटेसियो हिला ४-१ असे नमविले. सोनिया लाथेरनेही विजयी सुरुवात करताना चंद्रकला थापाला ५-० असे लोळवले. (वृत्तसंस्था)

अमित पंघालकडून पदकाची अपेक्षा
पुरुषांच्या ५२ आणि ५६ किलो वजन गटात भारताला तीन पदकांची आशा आहे. आशियाई चॅम्पियनशिपचे रौप्य विजेता कविंदर बिश्तशिवाय ५६ किलो गटात राष्टÑकुलचे कांस्य विजेता मोहम्मद हस्समुद्दीन आणि विश्व चॅम्पियनशिपचा कांस्य विजेता गौरव विधुडी हे पदक मिळविण्याच्या निर्धाराने उतरणार आहेत. ५२ किलो गटात अमित पंघाल याच्यासह राष्टÑकुलचा सुवर्ण विजेता गौरव सोळंकी आणि सचिन सिवाच यांच्याकडूनही देशाला पदकाची आशा आहे.

Web Title: The host of India has confirmed ten medals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.