राज्यातील २९ खेळांसाठीच मिळणार ग्रेस गुण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 04:08 AM2019-05-15T04:08:12+5:302019-05-15T04:08:29+5:30

४९ क्रीडा प्रकारांना मान्यता देण्यासाठी नोंदणीकृत क्रीडा संघटनांकडून क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने प्रस्ताव मागविले होते.

 Grace marks will be available for 29 sports in the state | राज्यातील २९ खेळांसाठीच मिळणार ग्रेस गुण

राज्यातील २९ खेळांसाठीच मिळणार ग्रेस गुण

Next

- राजेश मडावी

चंद्रपूर : ४९ क्रीडा प्रकारांना मान्यता देण्यासाठी नोंदणीकृत क्रीडा संघटनांकडून क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने प्रस्ताव मागविले होते. मात्र २० क्रीडा संघटनांनी ३० जून २०१० पर्यंत प्रस्तावातील त्रुटी दूर केल्या नाहीत. त्यामुळे केवळ २९ खेळांनाच मान्यता मिळाली असून संबंधित विद्यार्थ्यांना ग्रेस गुण मिळणार आहेत. उर्वरित २० प्रकारचे एकविध खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांवर क्रीडा संघटनांच्या उदासिन भूमिकेमुळे अन्याय झाला आहे.
ग्रामीण भागातून विविध प्रकारचे खेळ पुढे आले आहेत. अशा खेळांचाही समावेश व्हावा, याकरिता मान्यताप्राप्त ४९ संघटनांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात दुरुस्ती सुचविल्यानंतर एकविध खेळांच्या राज्य व राष्ट्रीय अशा २९ संघटनांनी पूर्तता करून नवीन अहवाल सादर केला. त्यामुळे हे खेळ विद्यार्थ्यांच्या ग्रेस गुणांसाठी पात्र ठरले. उर्वरित २० संघटनांनी ३० एप्रिल २०१९ पर्र्यंत त्रुटींची पूर्तता केली नाही.

गे्रस गुणांसाठी पात्र ठरलेले खेळ
अ‍ॅथलेटिक्स, बॉक्सिंग, सायकलिंग, फेन्सिंग, फेन्सिंग, फुटबॉल, ज्युडो, टेबल टेनिस, वुशू सेपक टकरा, टेनिक्वाईट, मल्लखांब. सॉप्टबॉल, चेस, स्क्वॅश, आट्यापाट्या, रग्वी, फुटबॉल, खो-खो, बॉलबॅडमिंटन, आर्चरी, अ‍ॅमच्युअर कबड्डी, जिम्नॅस्टिक, रायफल, रोलबॉल, बॅडमिंटन, हॅण्डबॉल, टेनिस, हॉकी आदी खेळांना ग्रेस गुणांची सवलत लागू झाली आहे.

Web Title:  Grace marks will be available for 29 sports in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.