आॅलिम्पिक पदक पटकावून ‘खेलरत्न’ मिळविणार, डबल ट्रॅप नेमबाज श्रेयसी सिंग हिचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 04:26 AM2018-09-28T04:26:39+5:302018-09-28T04:26:58+5:30

The goal of double trap shooter Shreyasi Singh, to get 'Khel Ratna' after winning the Olympic medal | आॅलिम्पिक पदक पटकावून ‘खेलरत्न’ मिळविणार, डबल ट्रॅप नेमबाज श्रेयसी सिंग हिचे लक्ष्य

आॅलिम्पिक पदक पटकावून ‘खेलरत्न’ मिळविणार, डबल ट्रॅप नेमबाज श्रेयसी सिंग हिचे लक्ष्य

googlenewsNext

नवी दिल्ली : टोकियोत दोन वर्षांनंतर होणाऱ्या आॅलिम्पिकपर्यंत फिटनेस व खेळ यात अत्युच्य गुणवत्ता मिळविण्यासह आॅलिम्पिक पदक जिंकणे तसेच ‘खेलरत्न’ पुरस्कार मिळविणे हे लक्ष्य असल्याचे डबल ट्रॅप नेमबाज श्रेयसी सिंग हिचे मत आहे.
राष्टÑकुल सुवर्ण विजेती २७ वर्षांची श्रेयसीला यंदा अर्जुन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पण तिला सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवायचा आहे. आॅलिम्पिक पदक जिंकताच हा पुरस्कार मिळेलच याची तिला जाणीव आहे.
कुठलाही पुरस्कार तुम्हाला अधिक चांगल्या कामगिरीची प्रेरणा देतो, असे सांगून श्रेयसी म्हणाली,‘अर्जुन पुरस्कारामुळे मला खेलरत्न जिंकण्याची प्रेरणा मिळाली. खेलरत्नसाठी मला आॅलिम्पिक पदक जिंकायचेच आहे.’ माजी नेमबाज मानशेरसिंग यांची शिष्या असलेल्या श्रेयसीने आॅलिम्पिक पात्रता फेरीसाठी सराव सुरू केला आहे. आॅलिम्पिक पदकासाठी परफेक्ट बनावे लागेल, असे तिने सांगितले. (वृत्तसंस्था)

प्रशिक्षक महत्त्वाचे

‘सुमा शिरुर, जसपाल राणासारख्या अनुभवी प्रशिक्षकांमुळे युवा नेमबाज ज्युनियर स्तरावर चमकत आहेत. या बळावर २०२८ पर्यतच्या आॅलिम्पिकमध्ये आमचे खेळाडू पदक मिळवतील,’ अशी अशाही श्रेयसीने व्यक्त केली.

Web Title: The goal of double trap shooter Shreyasi Singh, to get 'Khel Ratna' after winning the Olympic medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.