दक्षिण डेअर स्पर्धेत गौरव गिलची बाजी, सहा वर्षांनंतर पटकावले जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 04:23 PM2018-09-09T16:23:37+5:302018-09-09T16:24:08+5:30

गौरव गिलने पुन्हा एकदा मारुती सुझुकी दक्षिण डेअर कार स्पर्धेत चमक दाखवत आपली छाप पाडली.

Gaurav Gill's title in the Dakshin Dare Championship | दक्षिण डेअर स्पर्धेत गौरव गिलची बाजी, सहा वर्षांनंतर पटकावले जेतेपद

दक्षिण डेअर स्पर्धेत गौरव गिलची बाजी, सहा वर्षांनंतर पटकावले जेतेपद

Next

मुंबई -  गौरव गिलने पुन्हा एकदा मारुती सुझुकी दक्षिण डेअर कार स्पर्धेत चमक दाखवत आपली छाप पाडली. त्याने सहा वर्षांनंतर ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. त्याचा नेव्हीगेटर मुसा शरीफसह त्याने सहा एपीआरसी आणि महिंद्रा ऍडव्हेंचर रेसमध्ये छाप पाडल्यानंतर या जोडीने 15 टप्प्यांत आपली चमक दाखवली. गिलने 06:57:44 वेळेसह पाच स्तर पूर्ण केले. इतरांपेक्षा 15 मिनिटांच्या फरकाने त्याने बाजी मारली. रॅलीच्या लांब पल्ल्यासाठी त्याने सर्वाधिक 01:15:50 मिनिटे वेळ नोंदवली. 



बाईक गटात विनय प्रसादने जेतेपद पटकावले. रॅलीतील शेवटच्या एसएस12 टप्प्यात युवा कुमार पिछाडीवर पडल्याने विनय प्रसादने आघाडी घेतली. युवा या गटात सुरुवातीला आघाडी होता.15 किमी शिल्लक असताना त्याच्या बाईकमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे त्याला 15 मिनिटांचा फटका बसला व जेतेपद गमवावे लागले.


गिलचा संघ सहकारी फिलिपोस मथाई (पीव्हीएस मूर्ती) यांनी दुसरे स्थान मिळवले तर,मारूती सुझुकीच्या सम्राट यादव ( करण उकतासह) याने तिसरे स्थान पटकावले. गिल व मुसा यांनी दक्षिण डेयर मध्ये चमक दाखवली. त्यांची एकत्रितपणे 50 रॅली केल्या असून त्यापैकी 31 रॅलीमध्ये विजय मिळवला. यासोबत 35 वेळा ते पोडीयममध्ये आले आहेत. त्यापैकीच फक्त 15 वेळा ते तांत्रिक बिघाडमुळे फक्त त्यांची संधी हुकली. 

Web Title: Gaurav Gill's title in the Dakshin Dare Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.