फेडरेशन चषक खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी घोडदौड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 10:10 PM2019-06-01T22:10:15+5:302019-06-01T22:11:04+5:30

पुरुषांच्या सामन्यात महाराष्ट्राने यजमान पूदूचेरीचा १४-९ (१४-४, ०-५) असा एक डाव ५ गुणांनी धुव्वा उडवला.

Federation Cup Kho-Kho Tournament: The victory of both the teams of Maharashtra | फेडरेशन चषक खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी घोडदौड

फोटो प्रातिनिधिक आहे.

googlenewsNext

मुंबई : खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने होणारी तीसावी फेडरेशन चषक खो-खो स्पर्धा पूदूचेरी येथे सुरू झाली आहे. या स्पर्धेत पुरुषांच्या सामन्यात महाराष्ट्राने यजमान पूदूचेरीचा १४-९ (१४-४, ०-५) असा एक डाव ५ गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात महाराष्ट्राच्या सुयश गरगटेने २:५० मि. संरक्षण करत ३ गडी बाद केले, ऋषिकेश मुर्चावडेने २:१० मि. संरक्षण केले, तर कर्णधार श्रेयश राऊळसह प्रसाद राडीये, गजानन शेंगाळ व सुरेश सावंत यांनी प्रत्येकी २:०० मि. संरक्षण करून प्रत्येकी एक गडी बाद केला व महाराष्ट्राचा विजय सुकर केला. तर पूदूचेरीच्या के. प्रशांत, एम. विमल कुमार व एस. शरथ कुमार यांनीच चांगली खेळी करून सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. 

महिलांच्या सामन्यात महाराष्ट्राने प. बंगालचा १०-०४ असा एक डाव ६ गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात महाराष्ट्राच्या प्रियंका भोपीने नाबाद ४:२० मि. संरक्षण करत ३ बळी मिळवले. अपेक्षा सुतार (२:४० मि. संरक्षण १ बळी), तर रूपाली बडे व प्राची जटनुरे यांनी प्रत्येकी २:०० मि संरक्षण करत महाराष्ट्राला विजयी सुरवात करून दिली. तर प. बंगालच्या मौसमी तरफदार, अर्पिता मोंडल व एशिता बिस्वास यांनीच थोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना काही यश मिळवता आले नाही.

महिलांच्याच दुसर्‍या एका सामन्यात महाराष्ट्राने हरयाणाचा १०-०७ असा एक डाव तीन गुणांनी धुव्वा उडवला.         

Web Title: Federation Cup Kho-Kho Tournament: The victory of both the teams of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.