फेडरेशन चषक खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राचे दोन्ही संघ अंतिम फेरीत  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 05:34 PM2019-06-02T17:34:08+5:302019-06-02T17:34:20+5:30

खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने होणारी तीसावी फेडरेशन चषक खो-खो स्पर्धा पूदूचेरी येथे सुरू असून या स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी रुबाबात अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.  

Federation Cup Kho-Kho Tournament: Both the teams of Maharashtra are in the final | फेडरेशन चषक खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राचे दोन्ही संघ अंतिम फेरीत  

फेडरेशन चषक खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राचे दोन्ही संघ अंतिम फेरीत  

Next

मुंबई :  खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने होणारी तीसावी फेडरेशन चषक खो-खो स्पर्धा पूदूचेरी येथे सुरू असून या स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी रुबाबात अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.  

या स्पर्धेत पुरुषांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने प. बंगालचा १३-१२ (१३-६, ०-६) असा एक डाव १ गुणाने धुव्वा उडवला. या सामन्यात महाराष्ट्राच्या अक्षय गणपुलेने २:०० मि. संरक्षण करत एक गडी बाद केला, ऋषिकेश मुर्चावडेने १:५०, १:३० मि. संरक्षण केले, प्रतिक वाईकरने १:५०, १:५० मि. संरक्षण करत एक गडी बाद केला व सुरेश सावंतने १:४० मि. संरक्षण करत दोन गडी बाद केले. तर प. बंगालच्या मनोजने १:२०, १:०० मि. संरक्षण केले व अनुकूलने १:०० मि. संरक्षण करत चार गडी बाद केले मात्र महाराष्ट्राच्या झंजावातापूढे प. बंगालचा निभाव लागू शकला नाही.       

पुरुषांच्या दुसर्‍या उपांत्य फेरीच्या सामन्यात कोल्हापूराने कर्नाटकचा १९-१६ (१०-८,९-८) असा चुरशीच्या सामन्यात ३ गुणांनी पराभव केला. कोल्हापूरच्या प्रीतम चौगलेने २:३०, १:१० मि. संरक्षण करत १ गडी बाद केला, नीलेश जाधवने २:०० मि. संरक्षण करत २ गडी बाद केले, आकाश माळीने १:००, १:५० मि. संरक्षण केले तर सागर पोदारने १:०० मि. संरक्षण करत पाच गडी बाद केले व रुबाबात अंतिम फेरीत स्थान मिळवले. पराभूत कर्नाटकच्या मुंगेर बसनाने २:०० , १:४० मि. संरक्षण करत एक गडी बाद केला, रमेश मालवडने १:०० मि. संरक्षण करत पाच गडी बाद केले व सुदर्शनने १:४०, १:५० मि. संरक्षण करत एक गडी बाद केला मात्र ते आपल्या संघाला विजयश्री मिळवून देऊ शकले नाहीत.        

महिलांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने केरळाचा ६-५ (४-२,२-३) असा ४:४० मि. राखून विजय मिळवताना अंतिम फेरीचे दार उघडले. महाराष्ट्राच्या प्रियंका भोपीने नाबाद २:५०, ५:०० मि. संरक्षण करत १ बळी मिळवला, रूपाली बडेने ३:३०, २:१० मि. संरक्षण केले, अपेक्षा सुतारने २:४० मि. संरक्षण करत १ बळी मिळवला तर पराभूत एस. वर्षाने ३:२०, १:३० मि. संरक्षण केले, के. कलाईवणी २:३०, २:५० मि. संरक्षण केले तर आर. विल्सनने तीन बळी मिळवत सामन्यात रंगत भरण्याचा प्रयत्न केला मात्र ते विजय मिळवू शकल्या नाहीत.        

महिलांच्या दुसर्‍या उपांत्य फेरीच्या सामन्यात गुजरातने प. बंगालचा ७-६ असा साडेचार मि. राखून विजय मिळवत अंतिम फेरीतील स्थान पक्के केल.

Web Title: Federation Cup Kho-Kho Tournament: Both the teams of Maharashtra are in the final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kho-Khoखो-खो