शेतकऱ्याची पोर लई हुश्शार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 01:59 AM2019-01-21T01:59:37+5:302019-01-21T02:00:49+5:30

‘खेलो इंडिया यूथ गेम्स’साठी मी कसून तयारी केली होती.

The farmer's helper! | शेतकऱ्याची पोर लई हुश्शार!

शेतकऱ्याची पोर लई हुश्शार!

Next

पुणे : ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’साठी मी कसून तयारी केली होती. यामुळे सुवर्णपदक जिंकण्याची खात्री होती, अशी प्रतिक्रिया तिरंदाजीतील महाराष्ट्राची सुवर्णपदकविजेती खेळाडू साक्षी शितोळे हिने रविवारी व्यक्त केली. मूळची दौंड तालुक्यातील पाडवी गावची रहिवासी असलेल्या साक्षीचे वडील शेतकरी आहेत.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा रविवारी संपली. तिरंदाजीमध्ये स्पर्धेत महाराष्टÑाला दुसरे स्थान मिळाले. अखेरच्या दिवशी साक्षीने २१ वर्षांखालील मुलींच्या रिकर्व्ह प्रकारात सुवर्णवेध घेतला. साक्षी ही पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्याालयात शिकत असून ती रणजित चामले यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंदाजीचा सराव करते.
साक्षी हिने आतापर्यंत
आशिया चषक स्पर्धेत ४ वेळा भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. यात लक्षणीय कामगिरी करीत
तिने २ रौप्यपदके प्राप्त
केली आहेत.
<यशाचे श्रेय पालक आणि प्रशिक्षकांना : ईशा पवार
१७ वर्षांखालील मुलींच्या गटात ईशा पवारने कम्पाऊंड महाराष्ट्राला सुवर्झ जिंकून दिले. तिने १५० गुणांपैकी १४५ गुणांची कमाई केली. या प्रकारात राज्य विक्रम नोंदविणाºया ईशा हिने गतवेळीही खेलो इंडियामध्ये सुवर्णपदक जिंकले होते. अखिल भारतीय स्तरावर ईशाला अग्रमानांकन असून ती ४ वर्षांपासून ओंकार घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. डेरवण येथील एसव्हीजे शिक्षण संस्थेत ती शिकत असून गतवर्षी तिने दक्षिण आशियाई स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्यपदक मिळविले होते.
या सुवर्णपदकाचे श्रेय माझे पालक आणि प्रशिक्षक यांना आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी या खेळात आतापर्यंत यशस्वी वाटचाल करू शकले. आगामी जागतिक युवा स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करून सर्वोच्च यश मिळविण्याचे माझे ध्येय आहे, अशी प्रतिक्रिया १५ वर्षींय ईशाने
व्यक्त केली.
>पहिल्या फेरीपासूनच मी सुवर्णपदक जिंकण्याच्या इराद्याने खेळ केला. पुरेशी तयारी झालेली असल्याने सुवर्णपदकाची खात्री होती. ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’मधील हे विजेतेपद माझ्यासाठी खास आहे.
- साक्षी शितोळे

Web Title: The farmer's helper!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.