नॉटिंघम (इंग्लंड) : भारतीय उपखंडातील संघांना इंग्लंडच्या वातावरणात खेळणो कठीण जात असले तरी आगामी मालिकेत आपण चांगली कामगिरी करण्यावर भर देणार असल्याचे मत भारताचा फलंदाज विराट कोहली याने व्यक्त केले. हा दौरा दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौ:यासारखाच आहे. या चार देशात चांगली कामगिरी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. माङोही पूर्ण लक्ष या दौ:यावर केंद्रीत झाले आहे, असेही कोहली म्हणाला.
इंग्लंड दौ:यात भारत पाच कसोटी सामने खेळणार आहे. त्यासाठी उभय संघांनी सराव सुरु केला. मालिकेतील एक सामना लॉर्डसवर होत असल्याने कोहली खूष आहे, कारण कोहली लॉर्डसवर पहिल्यांदाच खेळणार आहे. याबद्दल तो म्हणाला, लॉर्डसवर पहिल्यांदाच खेळत असल्याने मनात उत्सुकता आहे. या संधीचे सोने करण्याची माझी योजना आहे. मी या दौ:यासाठी काही उद्दिष्टे ठेवली आहेत. ती पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल. 
इंग्लंडविरुध्दच्या गेल्या दोन मालिकेतील आकडेवारी भारताच्या बाजूची नाही, 2011 मध्ये भारत इंग्लंडमध्ये 0-4 अशी मालिका हरला होता. त्यानंतर भारतातील मालिकेतही त्यांना 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता. याचा दबाव भारतीय संघावर असल्याचा मात्र कोहलीने इन्कार केला. तो म्हणाला, तो काळ वेगळा होता. आत्ताचा आमचा संघ पूर्णपणो युवा खेळाडूंचा भरणा असलेला आहे. यंदा चांगली कामगिरी करण्यावर आमचा भर राहील.
 
आमचे पारडे जड : ब्रॉड
नॉटींघम येथे बुधवारपासून सुरु होणा:या पहिल्या कसोटी सामन्यात आमचे पारडे जड राहील, असा दावा इंग्लंडचा कर्णधार स्टुअर्ट ब्रॉड याने केला आहे. तो म्हणाला या मैदानावर गेल्या सात सामन्यापैकी पाच सामने आम्ही जिंकले आहेत. अँडरसन आणि बेल या दोघांसाठी हे मैदान ‘लकी’ आहे.