खेळाडूंचा बेजबाबदारपणा नडला : धोनी

By admin | Published: June 1, 2014 12:40 AM2014-06-01T00:40:22+5:302014-06-01T00:40:22+5:30

वरिष्ठ खेळाडूंनी बेजबाबदारपणो खेळ केल्यामुळे आम्हाला किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या दुस:या क्वालिफायर लढतीत पराभव स्वीकारावा लागला,

Dhoni's irresponsibility: Dhoni | खेळाडूंचा बेजबाबदारपणा नडला : धोनी

खेळाडूंचा बेजबाबदारपणा नडला : धोनी

Next
>मुंबई : चेन्नई संघातील मधल्या फळीतील वरिष्ठ खेळाडूंनी बेजबाबदारपणो खेळ केल्यामुळे आम्हाला किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या दुस:या क्वालिफायर लढतीत पराभव स्वीकारावा लागला, असे मत चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने व्यक्त केले आह़े 
 धोनी म्हणाला, की सुरेश रैना याच्या अवघ्या 25 चेंडूंतील 87 धावांच्या वादळी खेळीमुळे आम्हाला 227 धावांचे लक्ष्य सहज गाठता येईल, असे वाटले होत़े मात्र, त्यानंतर आमच्या मधल्या फळीतील अनुभवी खेळाडूंनी बेजबाबदारपणो खेळ केल्यामुळे सामना आमच्या हातून निसटला़
धोनीने पुढे सांगितले, की आमचे गोलंदाज या लढतीत प्रथम फलंदाजी करणा:या पंजाब 2क्क् चा आकडा पार करू देणार नाहीत, असे वाटले होत़े मात्र, असे होऊ शकले नाही़ याची खंत आह़े पंजाबच्या फलंदाजांनी उत्कृष्ट खेळ करून मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली़  सेहवागने सामन्याचा पूर्ण नूर बदलून टाकला़ एकदा त्याची बॅट चालायला लागली, की समोर कोणता गोलंदाज आह़े याला महत्त्व नसत़े अखेर तो दिवस त्याचा होता़ त्याने केलेल्या कामगिरीसाठी तो कौतुकास पात्र आहे, असेही धोनी म्हणाला़ 

Web Title: Dhoni's irresponsibility: Dhoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.