नवी दिल्ली : बीसीसीआयचे क्रीडा विकास महाप्रबंधक रत्नाकर शेट्टी यांना खोटी साक्ष प्रकरणी तत्काळ हटवण्यात यावे अशी मागणी आदित्य वर्मा यांनी लोढा समितीकडे केली आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील याचिकाकर्ते आदित्य वर्मा यांनी म्हंटले आहे की, शेट्टी यांच्या बीसीसीआय प्रशासनातील उपस्थितीने चुकीचा संदेश जात आहे. लोढा समितीने बीसीसीआय सीईओंना तत्काळ निर्देश जारी करुन शेट्टी यांना पद सोडण्यास भाग पाडावे. (वृत्तसंस्था)