Breaking news : राही सरनोबतने विश्वचषकात फडकवला तिरंगा, सुवर्णपदकाला गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 09:06 PM2019-05-27T21:06:28+5:302019-05-27T21:10:02+5:30

नेमबाजी विश्वचषकात 25 मी. पिस्तुल प्रकारात राहीने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

Breaking news: Rahi Sarnobhatta won the gold medal in World Cup | Breaking news : राही सरनोबतने विश्वचषकात फडकवला तिरंगा, सुवर्णपदकाला गवसणी

Breaking news : राही सरनोबतने विश्वचषकात फडकवला तिरंगा, सुवर्णपदकाला गवसणी

Next

मुंबई : जर्मनी येथे झालेल्या नेमबाजी विश्वचषकात राहीने सुवर्ण पटकावत भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. नेमबाजी विश्वचषकात 25 मी. पिस्तुल प्रकारात राहीने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. या सुवर्णपदकासह राहीने टोकिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठीची पात्रताही पूर्ण केली आहे.

विश्वविक्रम नोंदवत सौरभने जिंकले सुवर्णपदक
भारताचा युवा नेमबाज सौरभ तिवारी याने अपेक्षेनुरूप धडाकेबाज कामगिरी करताना जर्मनीच्या म्युनिच येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषकाच्या पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्टलमध्ये सुवर्ण पटकावले. विशेष म्हणजे यावेळी सौरभने नवीन विश्वविक्रम नोंदवण्याचा पराक्रम केल्याने त्याच्या सुवर्ण पदकाला आणखी झळाळी आली.
मेरठच्या १७ वर्षीय चौधरीने अंतिम फेरीमध्ये २४६.३ गुण नोंदवले. अशा प्रकारे त्याने फेब्रुवारीत नवी दिल्ली येथे विश्वचषकातील स्वत: केलेला २४५ गुणांचा विक्रम मोडीत काढला. चौधरीने याआधीच टोकियो आॅलिम्पिकसाठी कोटा प्राप्त केलेला आहे. दहा मीटर एअर पिस्टलमध्ये रशियाच्या आर्तम चेरसुनोवने रौप्य आणि चीनच्या वेई पेंगने कांस्यपदक जिंकले.
चौधरीने अंतिम फेरीमध्ये पहिल्या शॉटमध्ये ९.३ गुण मिळवले होते; परंतु त्यानंतर सलग पाच शॉटमध्ये १०.१ गुणांची नोंद केली. पहिल्या फेरीच्या शॉट्सनंतर तो चेरसुनोव्हाच्या तुलनेत ०.६ गुणांनी पिछाडीवर होता. दुसºया फेरीत सहा शॉटमध्ये मात्र त्याने आघाडी मिळवली. त्यात त्याने तीन शॉटमध्ये १० पेक्षा कमी गुण मिळवले; परंतु दोन शॉटमध्ये सलग १०.७ गुणांची कमाई केली. भारतीय नेमबाजाने त्यानंतर प्रत्येक एलिमिनेशनमध्ये आघाडी कायम ठेवली. त्याने अखेरीस १०.३ चे दोन शॉट, तर एक शॉट १०.७ चा लगावला. चौधरीचा अखेरचा शॉट १०.६ चा होता. त्यात तो स्वत:चा विक्रम मोडण्यात यशस्वी ठरला.
भारताचा शहजार रिझवीदेखील या स्पर्धेत सहभागी होता. त्याने अंतिम फेरीमध्ये स्थान मिळवले खरे; परंतु अखेरीस १७७.६ गुणांसह तो पाचव्या स्थानावर राहिला. भारताचे म्युनिच विश्वचषकातील हे दुसरे सुवर्णपदक ठरले. याआधी रविवारी अपूर्वी चंदेला हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. 

राही सरनोबतची आॅलिम्पिक एन्ट्री
महाराष्ट्राची शान असलेल्या स्टार नेमबाज राही सरनोबतने पुढील वर्षी होणाºया  टोकियो आॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवताना म्यूनिच विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले.
२५ मीटर पिस्तूलमध्ये सहज वर्चस राखताना राहीने बाजी मारली. अंतिम फेरीत आपला दबदबा राखताना राहीने एकूण ३७ निशाने साधले. याआधी २०१३ साली चांगवन विश्वचषक स्पर्धेतही राहीने सुवर्ण जिंकले होते.

Web Title: Breaking news: Rahi Sarnobhatta won the gold medal in World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.