बॉडी बिल्डिंग म्हणजे तारेवरची कसरत, सांगतोय मुंबई श्री अनिल बिलावा

By प्रसाद लाड | Published: February 28, 2019 07:53 PM2019-02-28T19:53:21+5:302019-02-28T19:58:00+5:30

नवोदित श्री नंतर 'या' कारणासाठी गायब झालो होतो

Bodybuilding is not easy game, told Mumbai Shri Anil Bilawa | बॉडी बिल्डिंग म्हणजे तारेवरची कसरत, सांगतोय मुंबई श्री अनिल बिलावा

बॉडी बिल्डिंग म्हणजे तारेवरची कसरत, सांगतोय मुंबई श्री अनिल बिलावा

googlenewsNext
ठळक मुद्देसंजय चव्हाण यांच्यासारखे गुरु मिळायला भाग्य लागतंकारणं देणार असाल तर बॉडीबिल्डींगमध्ये येऊच नकानवोदित मुंबई श्री खेळताना नर्व्हस होतो

मुंबई : शरीरसौष्ठवपटू एखाद्या शिल्पासारखा आखीव0रेखीव असतो. पण हे शिल्प घडवताना प्रचंड मेहनत लागते, याचा विचार आपण करत नाही. बॉडी बिल्डिंग म्हणजे तारेवरची कसरत आहे, असे दस्तुरखुद्द मुंबई श्री अनिल बिलावाने सांगितले आहे. नवोदित मुंबई श्री आणि मुंबई श्री हे दोन्ही किताब पटकावत अनिलने एक इतिहास रचला आहे. कारण हे दोन्ही किताब आतापर्यंत एकाही शरीरसौष्ठवपटूला जिंकता आले नव्हते. हा इतिहास रचल्यावर अनिलने लोकमतशी खास बातचीत केली आणि हा रहस्य उलगडली आहे. 

नवोदित मुंबई श्री खेळताना नर्व्हस होतो
यापूर्वी मी कधीच बॉडी बिल्डिंगसाठी स्टेजवर गेलो नवहतो. त्यामुळे पहिल्यांदा स्टेजवर गेलो नर्व्हस होतो. पण काही वेळाने मी सावरलो. पहिल्यांदा वाटलं नव्हते की ही स्पर्धा मी जिंकेन. पण जेव्हा गटातील स्पर्धा झाली तेव्हा कुठेतरी विश्वास निर्माण झाला की, आपण हे जेतेपद पटकावू शकतो. हे माझे पहिले जेतेपद होते. पण या जेतेपदाचा आनंद शब्दांत सांगू शकत नाहीत, असे अनिल सांगत होता.

नवोदित श्री नंतर 'या' कारणासाठी गायब झालो होतो
मी फक्त बॉडी बिल्डिंग करत नाही. कारण कुटुंबाचा भारही माझ्यावर आहे. त्यामुळे मला ऑफिसलाही जावे लागते. त्यामुळे सर्व स्पर्धा मी खेळू शकत नाही. ऑफिस, घर आणि बॉडीबिल्डींग करणे सोपे नाही.  बॉडीबिल्डींग म्हणजे तारेवरची कसरत आहे. सर्व सांभाळण्यासाठी मी नवोदित मुंबई श्री नंतर कुठल्याही स्पर्धेत खेळलो नाही आणि थेट मुंबई श्री या स्पर्धेत उतरलो, असे अनिलने सांगितले.

हा पाहा खास व्हिडीओ

 

कारणं देणार असाल तर बॉडीबिल्डींगमध्ये येऊच नका
बॉडीबिल्डींग हा काही सोपा खेळ नाही. कारण या खेळाची तयारी करताना बऱ्या गोष्टी पाळाव्या लागतात. काही गोष्टींवर बंधनं येतात. प्रत्येक 2-2 तासांनी आहार घ्यावा लागतो, त्याचबरोबर व्यायामही करावा लागतो. काय आहार करायचा आणि कोणते व्यायाम प्रकार करायचे, ते कधी आणि केव्हा करायचे हेदेखील महत्वाचे असते. त्यामुळे या खेळाची तयारी करणे सोपे नाही. तुम्ही कोणताही सबब यासाठी देू सकत नाही. तुम्ही जर काही कारणं देत असाल तर तुम्ही काही करू शकत नाही, त्यापेक्षा तुम्ही या क्षेत्रात येऊच नये, असे अनिलने सांगितले.


संजय चव्हाण यांच्यासारखे गुरु मिळायला भाग्य लागतं
मी बऱ्याच वर्षांपासून व्यायाम करत होतो. पण शरीरसौष्ठव करण्यासाठी उत्सुक नव्हतो. स्वत:चे ज्ञान कमी असते, तुम्हाला गुरु हा प्रत्येक क्षेत्रात लागतो. मी त्यांना फोन करून भेट घेतली आणि माझा मनोदय व्यक्त केला. 24 ऑगस्टला सरांकडे गेलो होतो. सरांनी डाइट आणि व्यायाम करायला सांगितला. त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. संजय सरांसारखा गुरु मिळायला भाग्य लागतं. कारण त्यांच्या मार्गदर्शनानंतर माझ्या आयुष्यात अमुलाग्र बदल झाला, असे अनिल म्हणाला.

Web Title: Bodybuilding is not easy game, told Mumbai Shri Anil Bilawa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.