Asian Games 2018 : यंदा ‘टॉप फाइव्ह’चे लक्ष्य साधणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 03:36 AM2018-08-16T03:36:01+5:302018-08-16T03:36:16+5:30

दोन दिवसांनी इंडोनेशिया (जकार्ता) येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताने आपला ५७२ खेळाडूंचा संघ पाठविला आहे. यंदा भारतीय संघ एकूण ३६ क्रीडा प्रकारांमध्ये आपला सहभाग नोंदवेल.

Asian Games 2018: Will the goal of 'Top Five' be targeted this year? |  Asian Games 2018 : यंदा ‘टॉप फाइव्ह’चे लक्ष्य साधणार का?

 Asian Games 2018 : यंदा ‘टॉप फाइव्ह’चे लक्ष्य साधणार का?

Next

मुंबई : दोन दिवसांनी इंडोनेशिया (जकार्ता) येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताने आपला ५७२ खेळाडूंचा संघ पाठविला आहे. यंदा भारतीय संघ एकूण ३६ क्रीडा प्रकारांमध्ये आपला सहभाग नोंदवेल. या आधी २०१४ मध्ये झालेल्या इंचियोन आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये ५४१ खेळाडूंचा समावेश होता. आतापर्यंत आशियाई स्पर्धेच्या इतिहासात भारताने १३९ सुवर्ण पदकांसह एकूण ६१६ पदकांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, यातील ८२ सुवर्ण पदक १९८६ साली झालेल्या सेऊल आशियाई स्पर्धेपर्यंत जिंकले आहेत. यानंतर, भारताला केवळ ५७ सुवर्ण पटकावण्यात यश आले आहे. सुरुवातीच्या १० आशियाई स्पर्धा सत्रांच्या तुलनेत नंतरच्या ७ सत्रांमध्ये भारताच्या सुवर्ण पदकांमध्ये १८ % कमतरता आली आहे. त्याच वेळी, या दरम्यान खेळाडूंच्या सुविधांमध्ये मात्र कमालीची वाढ झाली. शिवाय, १९८६ सालानंतर भारताला एकदाही अव्वल पाच देशांमध्ये स्थान मिळविता आले नाही. त्यामुळेच यंदा भारतीय संघ ‘टॉप फाइव्ह’ ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या ४ आशियाई स्पर्धांवर नजर टाकल्यास दिसून येईल की, भारताने स्पर्धेसाठी पाठविलेल्या एकूण खेळाडूंच्या संख्येचा १०% एवढे पदके जिंकली आहेत. यानुसार, २००२ साली दक्षिण आफ्रिकेत (बुसान) झालेली स्पर्धा भारतासाठी अत्यंत निराशाजनक ठरली. त्या वेळी भारताने १० सुवर्ण पदकांसह एकूण ३५ पदके जिंकत पदक तालिकेत आठवे स्थान पटकावले होते. एकूण विचार करता, १९९० साली बीजिंगमध्ये भारताची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. त्या वेळी भारतीय संघ पदकतालिकेत अकराव्या स्थानी राहिला होता आणि केवळ एक सुवर्ण पदकासह एकूण २३ पदक जिंकण्यात यशस्वी ठरलेला.
दोहा येथे १५व्या आशियाई स्पर्धेत भारताने २४ वर्षांनंतर पदकांचे अर्धशतक झळकावले होते. तेव्हा भारताने ५५० खेळाडूंचा संघ पाठविला होता. एकूण पदकांच्या बाबतीत भारताने २०१० साली ग्वांगझू आशियाई स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करत, गुणतालिकेत सहावे स्थान पटकावले होते. तेव्हा भारताने १० सुवर्ण पदकांसह एकूण ६५ पदके जिंकली होती. याहून अधिक पदके भारताने कोणत्याही आशियाई स्पर्धेत जिंकली नाहीत. २०१४ साली इंचियोन स्पर्धेतही भारताने ११ सुवर्णांसह एकूण ५७ पदक पटकावली होती.

जकार्ताला भारतीय संघ रवाना होण्यापूर्वी भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरेंदर बत्रा यांनी यंदा भारत ६५-७० पदक जिंकण्यात यशस्वी होईल, अशी आशा व्यक्त केली. विशेष म्हणजे, आशिया स्पर्धेत सहभागी होणाºया सर्व देशांंमध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने चीननंतर भारताचा क्रमांक लागतो, परंतु असे असले, तरी स्पर्धेतील अव्वल पाच देशांमध्ये भारताचा क्रमांक येत नाही.

यंदा भारतीय संघ मजबूत भासत असला, तरी मोठ्या प्रमाणात पदकांची लयलूट करण्याबाबत शंका व्यक्त होत आहे. या आधी झालेल्या इंचियोन स्पर्धेत भारताने अ‍ॅथलेटिक्स, नेमबाजी, टेनिस, कुस्ती, तिरंदाजी, कबड्डी आणि बॉक्सिंग या खेळांमध्ये ५७ पैकी ४३ पदक पटकावले होते.

यंदा नेमबाजीत पदक पटकावण्याची भारताची शक्यता कमी मानली जाते. कारण या आधी ४४ स्पर्धा व्हायच्या व यंदा २० स्पर्धाच होतील. या आधी ज्या स्पर्धांमध्ये भारताने ७ पदके जिंकली होती, त्या स्पर्धा यंदा होणार नसल्याने भारतीय नेमबाजांपुढे अडचणी आहेत. याचमुळे स्टार नेमबाज जीतू राय, गगन नारंग, मेहुली घोष आणि शाहजर रिझवी यांचा भारतीय संघात समावेश नाही.

Web Title: Asian Games 2018: Will the goal of 'Top Five' be targeted this year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.