Asian Games 2018: इंडोनेशियाच्या मंत्र्याचा साधेपणा, सामान्य लोकांसोबत स्टँड्समध्ये उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 01:36 PM2018-08-20T13:36:37+5:302018-08-20T13:36:51+5:30

Asian Games 2018: इंडोनेशियामध्ये अतिशय प्रसिद्ध असलेले सार्वजनिक बांधकाम आणि गृहनिर्माण मंत्री बासुकी हदीमुलजोनो, अगदी सध्या वेशभूषेत, हाथामध्ये कॅमेरा आणि  काहीही सुरक्षा न ठेवता चक्क सामान्य लोकांसोबत स्टँड्समध्ये बसून जलतरण खेळाचा आनंद घेत होते.

Asian Games 2018: The simplicity of the Indonesian minister | Asian Games 2018: इंडोनेशियाच्या मंत्र्याचा साधेपणा, सामान्य लोकांसोबत स्टँड्समध्ये उपस्थिती

Asian Games 2018: इंडोनेशियाच्या मंत्र्याचा साधेपणा, सामान्य लोकांसोबत स्टँड्समध्ये उपस्थिती

googlenewsNext

- अभिजित देशमुख ( थेट जकार्तामुळे )
इंडोनेशियामध्ये अतिशय प्रसिद्ध असलेले सार्वजनिक बांधकाम आणि गृहनिर्माण मंत्री बासुकी हदीमुलजोनो, अगदी सध्या वेशभूषेत, हाथामध्ये कॅमेरा आणि  काहीही सुरक्षा न ठेवता चक्क सामान्य लोकांसोबत स्टँड्समध्ये बसून जलतरण खेळाचा आनंद घेत होते.

'या स्पर्धेचा आयोजनला खरं तर आम्हाला फक्त २ वर्ष  वेळ भेटला, त्यामुळे इतक्या कमी वेळात आंतरराष्ट्रीय दर्जेचे स्टेडियम,क्रीडाग्राम झटपट बांधण्याचे आव्हान होते. आम्ही दिवस रात्र एक करत, ८ तासाच्या ३ शिफ्ट न थांबता काम केले,' असे 'लोकमत'शी बोलताना त्यांनी सांगितले.

आम्ही क्रीडाग्राम मध्ये १० उंच व उत्कृष्ट दर्जाचे टॉवर बांधले, तिथे खेळाडू आणि अधिकारी मिळून १६००० लोकांची राहायची व्यवस्था केली आहे. खेळ जगात शांतता निर्माण करू शकतो, दक्षिण आणि उत्तर कोरिया उद्घाटन समारंभात एकत्र आले, हे एक मोठं उदाहरण आहे. भारतीय दलाचे या स्पर्धेत भाग घेतल्यामुळे त्यांचे सुद्धा आभार मानले.

ते पुढे म्हणाले, 'आम्ही आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी ५६ वर्ष वाट पाहिली.खेळ हा जगाशी जोडण्याचा एक उत्कृष्ट मार्ग आहे, आशियाई क्रीडा स्पर्धमुळे आमचा देश,संस्कृती,पर्यटनची माहिती जगाला कळेल. आमचं पुढचं लक्ष ऑलिम्पिक आयोजन करण्याचं असेल.' 

Web Title: Asian Games 2018: The simplicity of the Indonesian minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.