Asian Games 2018: नीरज चोप्राने केली या दिग्गजाच्या विक्रमाशी बरोबरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 09:14 AM2018-08-28T09:14:46+5:302018-08-28T10:45:00+5:30

Asian Games 2018: भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकीत सोमवारी सुवर्ण अध्याय लिहिला. आशियाई स्पर्धेत भालाफेक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. पण या पलीकडे त्याने आणखी एक विक्रम आपल्या नावावर नोंदवला.

Asian Games 2018: Neeraj Chopra emulates legendary Milkha Singh to equal incredible 60-year-old record | Asian Games 2018: नीरज चोप्राने केली या दिग्गजाच्या विक्रमाशी बरोबरी 

Asian Games 2018: नीरज चोप्राने केली या दिग्गजाच्या विक्रमाशी बरोबरी 

Next

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकीत सोमवारी सुवर्ण अध्याय लिहिला. आशियाई स्पर्धेत भालाफेक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. पण या पलीकडे त्याने आणखी एक विक्रम आपल्या नावावर नोंदवला. भारताचे माजी दिग्गज खेळाडू यांनी १९५८ मध्ये नोंदवलेला विक्रमाशी नीरजने सोमवारी बरोबरी केली. 

( सुवर्णपदक पटकावणारा नीरज भारताचा पहिला भालाफेकपटू )

भालाफेकीत काय घडले? 

नीरजने ८८.०६ मीटर भालाफेक करून स्वतःच्याच नावे असलेला राष्ट्रीय विक्रम मोडला आणि आशियाई स्पर्धेचे सुवर्णपदक नावावर केले. मागील दोन वर्षांतील महत्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील हे त्याचे चौथे सुवर्णपदक ठरले. त्याचबरोबर त्याने ६० वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. 



काय होता तो विक्रम आणि कोणाचा होता तो विक्रम? 
१९५८ च्या राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांनी ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. एकाच वर्षी राष्ट्राकुल आणि आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे ते पहिले भारतीय होते. त्यांच्या या पराक्रमाची पुनरावृत्ती नीरजने केली. गोल्ड कोस्ट येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत नीरजने सुवर्णपदक जिंकले होते आणि आशियाई स्पर्धेतही त्याने विक्रमी पदक जिंकले. मिल्खा सिंग यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला. 

( Asian Games 2018: नीरजने अटलबिहारी वाजपेयींना केले सुवर्णपदक समर्पित )



नीरज चोप्राची कामगिरी
२०१८ आशियाई स्पर्धेत सुवर्ण
२०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण
२०१७ आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण
२०१६ जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण 

Web Title: Asian Games 2018: Neeraj Chopra emulates legendary Milkha Singh to equal incredible 60-year-old record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.