Asian Games 2018 Live : बजरंगची सुवर्ण श्रद्धांजली, अटलबिहारी वाजपेयींना 'गोल्ड' समर्पित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 09:48 PM2018-08-18T21:48:38+5:302018-08-19T22:39:49+5:30

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे आजपासून आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 ला धुमधडाक्यात सुरुवात झाली. या स्पर्धेच्या धमाकेदार सोहळ्यात दिमाखात तिरंगा फडकला आहे. 18 व्या आशियाई स्पर्धेचा हा उद्घाटन सोहळा...

Asian Games 2018 Live: opening ceremony begins at gelora bung karno stadium in jakarta | Asian Games 2018 Live : बजरंगची सुवर्ण श्रद्धांजली, अटलबिहारी वाजपेयींना 'गोल्ड' समर्पित

Asian Games 2018 Live : बजरंगची सुवर्ण श्रद्धांजली, अटलबिहारी वाजपेयींना 'गोल्ड' समर्पित

Next

जकार्ता - भारताच्या बजरंग पुनियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. बजरंगने कुस्तीतील 65 किलो वजनीगटात सुवर्णपदक पटकावले आहे. भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी भारताचा गोल्डमन बजरंग पुनियाचे अभिनंदन केले आहे. आशियाई स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक असल्यामुळे हे अतिशय खास आहे, अशा शब्दात मोदींनी बजरंगचे कौतूक केले. त्यानंतर, बजरंगनेही धन्यवाद सर असा रिप्लाय मोदींच्या ट्विटला  दिला आहे.



 

भारतीय मल्ल आणि आशियाई स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण मिळवून देणाऱ्या बजरंगने आपले सुवर्णपदक दिवंगत भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केलं आहे. बजरंगने ट्विट करुन अटलजींना वंदन असेही म्हटले आहे. 



 


भारताच्या महिला हॉकी संघाने इंडोनेशियावर 8-0 असा विजय मिळवला



 

 

भारताच्या पुरुष कबड्डी संघाने बांगलादेशनंतर श्रीलंकेवरही दमदार विजय मिळवला. भारताने श्रीलंकेला 44-28 असे पराभूत केले.



 

 

 

 

संदीप तोमरला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का



 

 

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे आजपासून आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 ला धूमधडाक्यात सुरुवात झाली. भारताने या स्पर्धेतील आपले खाते कांस्यपदकाने उघडले आहे. 10 मीटर एअर रायफल मिक्स्ड स्पर्धेत भारताला मिळालं कांस्यपदक, अपूर्वी चंदेला आणि रवी कुमारनं मिश्र दुहेरीत कांस्यपदक मिळवलं. 10 मीटर एअर रायफल मिक्स्ड स्पर्धेत भारताचा अपूर्वी चंदेला आणि रवीकुमार ही जोडी अंतिम फेरीत दाखल, भारतीय संघानं 835.3 पॉइंट्स मिळवले. रवी कुमारला 420.0 आणि अपूर्वीने 415.3 पॉइंट्स मिळवले. भाराताचा दिग्गज कुस्तीपटू सुशील कुमारला पहिल्याच लढतीत पराभवाचा सामना करावा लागला, तर बजरंग पुनिया आणि संदीप तोमर यांनी विजयासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला

 

या स्पर्धेच्या धमाकेदार सोहळ्यात दिमाखात तिरंगा फडकला. 18व्या आशियाई स्पर्धेचा हा उद्घाटन सोहळा बुंग कार्णो स्टेडियममध्ये 50 हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत नृत्य, गाणे आणि आतषबाजीच्या नयनरम्य कलाविष्कारात पार पडला. भारतीय भाला फेक एथलिट नीरज चोपडा याने 572 सदस्यीय भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. यावेळी नीरजच्या हातात बुंग कार्णो स्टेडियममध्ये दिमाखात तिरंगा फडकत होता. नीरजच्या पाठीमागे भारतीय संघाचे प्रमुख बृजभूषण शरण आणि इतर भारतीय खेळाडू होते.

Live Upadate - 

-भारताचा अनुभवी पैलवान सुशील कुमारचा पुरुषांच्या 74 किलोग्रॅम स्पर्धेतल्या क्वालिफिकेशन राऊंडमध्ये पराभव 


- 10 मीटर एअर रायफल मिक्स्ड स्पर्धेत भारताला मिळालं कांस्यपदक, अपूर्वी चंदेला आणि रवी कुमारनं मिश्र दुहेरीत कांस्यपदक मिळवलं. 
- 10 मीटर एअर रायफल मिक्स्ड स्पर्धेत भारताचा अपूर्वी चंदेला आणि रवीकुमार ही जोडी अंतिम फेरीत दाखल, भारतीय संघानं 835.3 पॉइंट्स मिळवले. रवी कुमारला 420.0 आणि अपूर्वीने 415.3 पॉइंट्स मिळवले. 
- 10 मीटर एअर रायफल मिक्स्ड टीमचा क्वालिफिकेशन राऊंड सुरू, भारताचा अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार ही जोडी 835.3 पॉइंट्सनं दुस-या स्थानी, भारताला पदकाची आशा

- भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव
- भारतीय महिला कबड्डी टीम 41-12 पुढे खेळतेय
- पहिल्या हाफनंतर भारतीय महिला कबड्डी टीम 19-8नं पुढे
- भारतीय महिला टीम जपानहून 13-7ने पुढे
- भारताचा जलतरणपटू सौरभ सांगवेकर दुसऱ्या स्थानी, 1:54:87 वेळेत अंतर केलं पार.
- इंडोनेशियाची माजी बॅडमिंटन खेळाडू सुसी हिने आशियाई स्पर्धेची मशाल पेटवली. मशाल पेटवल्यानंतर इंडोनेशियन संस्कृतीची झलक विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून येत आहे. 


आशियाई स्पर्धेतील उद्घाटन सोहळ्यात दाझलिंग शो आकर्षक ठरला असून विद्युत रोषणाईने स्टेडियम उजाळल्याचे पाहायला मिळाले. स्टेडियमध्ये सर्वत्र विद्युत रोषणाई दिसून आली.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही इंडोनेशियामध्ये होत असलेल्या 18 व्या आशियाई स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी ट्वीट करताना, 'भारतीय संघाला इंडोनेशियातील आशियाई स्पर्धेसाठी शुभेच्छा। देशातील सर्वच भारतीयांना आमच्या खेळाडूंचा अभिमान आहे. तसेच या स्पर्धेत आमच्या खेळाडूंचे प्रदर्शन सर्वोत्कृष्ठ राहील, अशी आशा आम्हाला आहे, असे मोदींनी म्हटले आहे.


Web Title: Asian Games 2018 Live: opening ceremony begins at gelora bung karno stadium in jakarta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.