Asian Games 2018 LIVE Update: भारतीय महिला हॉकी संघाचा कझाकिस्तानवर विक्रमी विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 08:44 AM2018-08-21T08:44:20+5:302018-08-21T21:17:21+5:30

Asian Games 2018 LIVE Update: आशियाई स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी यशस्वी खिंड लढवली.

Asian Games 2018 LIVE: Maharashtra's Virdhawal Khade and Dattu Bhokanal qualify for final round | Asian Games 2018 LIVE Update: भारतीय महिला हॉकी संघाचा कझाकिस्तानवर विक्रमी विजय

Asian Games 2018 LIVE Update: भारतीय महिला हॉकी संघाचा कझाकिस्तानवर विक्रमी विजय

Next

भारतीय महिला हॉकी संघाला 21-0 असा दणदणीत विजय



 

 

 

भारताच्या पुरुष कबड्डी संघाने मिळवला थायलंडवर विजय



 

कुस्तीमध्ये दिव्याने पटकावले कांस्यपदक



 

 

 

#Sepaktakrawभारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक. कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत

#Shooting संजीव राजपूतने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारताला रौप्यपदक जिंकून दिले. अखेरच्या प्रयत्नांत त्याला सातत्य राखण्यात अपयश आले, परंतु त्याने भारतासाठी पदक निश्चित केले. त्याचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. राजपूतने 452.7 गुणांची कमाई केली. 



 

#Wrestling ग्रीको रोमन प्रकारात भारताचा कुस्तीपटू मनिषने 67 किलो वजनी गटाची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याने जपानच्या शिमोयामाडा त्सुचिकाचा 7-3 असा पराभव केला.

#Tennis सहाव्या मानांकित  अंकिता रैनाने जपानच्या होझुमी एरीचा 6-1, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 
#Shooting भारताला नेमबाजीत आणखी पदकाची अपेक्षा. संजीव राजपूतने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. 

- #Kabaddi भारतीय महिला संघाने अ गटात विजयी मालिका कायम राखताना उपांत्य फेरीत धडक दिली. त्यांनी इंडोनेशियाचा 54-22 असा धुव्वा उडवला.


- #Shooting 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात सौरभ चौधरीला सुवर्णपदक



 

- #Shooting 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात अभिषेक वर्माला कांस्य

 #Women’s volleyball भारतीय महिला संघाचे स्थान धोक्यात. ब गटात व्हिएतनामकडून 3-0 असा पराभव. 

जकार्ता - #Shooting सौरभ चौधरी आणि अभिषेक वर्मा यांनी 10 मीटर एअर पिस्तुल गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पात्रता फेरीत सौरभने सहा राऊंडमध्ये 99, 99, 93, 98, 98 आणि 99 अशा एकूण 586 गुणांची कमाई करताना अव्वल स्थान पटकावले, तर अभिषेकने 580 गुणांसह सहावे स्थान घेतले. 

 

 

आशियाई स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी यशस्वी खिंड लढवली. कोल्हापूरचा जलतरणपटू विरधवल खाडेने 50 मीटर फ्री स्टाईल गटाच्या पात्रता फेरीत 22.43 सेकंदाची वेळ नोंदवली. त्याने नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवताना अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. 2010च्या ग्वांझाऊ आशियाई स्पर्धेत विरधवलने 50 मीटर बटरफ्लाय गटात कांस्यपदक जिंकले होते.



आशियाई रोइंग अजिंक्यपद स्पर्धेत स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या नाशिकच्या दत्तू भोकनळने पुरूष एकेरी स्कल प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याने रेपेचेज राऊंडमध्ये 7 मिनिटे 45.71 सेकंदाची वेळ नोंदवली.  

कबड्डीत भारतीय महिला संघाने सलग तिसरा विजय मिळवला. त्यांनी श्रीलंकेचा 38-12 असा एकतर्फी पराभव केला.



तलवारबाजीत भारताच्या जस सीरत सिंगने महिला विभागात व्हिएतनामच्या ट्रॅन थी थूयचा 5-4 असा पराभव केला. 


 

Web Title: Asian Games 2018 LIVE: Maharashtra's Virdhawal Khade and Dattu Bhokanal qualify for final round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.