आशिया बास्केटबॉल शिबिर दिल्लीत रंगणार; १६ देशांतील ६६ खेळाडूंचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 12:18 AM2018-05-26T00:18:34+5:302018-05-26T00:18:34+5:30

हे शिबिर नवी दिल्ली येथील एनबीए अकादमी येथे ३० मे ते २ जून दरम्यान पार पडेल. या शिबिरात सहभागी होणाºया युवा खेळाडूंना योग्य प्रशिक्षण आणि खेळाच्या तांत्रिक गोष्टींचे ज्ञान देण्यात येणार असून, या सर्वांना बास्केटबॉल कोर्ट गाजवलेल्या दिग्गजांकडून विशेष मार्गदर्शन मिळेल.

Asia Basketball camp will be held in Delhi; 66 participants from 16 countries participated | आशिया बास्केटबॉल शिबिर दिल्लीत रंगणार; १६ देशांतील ६६ खेळाडूंचा सहभाग

आशिया बास्केटबॉल शिबिर दिल्लीत रंगणार; १६ देशांतील ६६ खेळाडूंचा सहभाग

Next
ठळक मुद्देनवी दिल्ली येथे रंगणाऱ्या ‘बास्केटबॉल विदाऊट बॉर्डर्स (बीडब्ल्यूबी) या १०व्या आशियाई शिबिरामध्ये सहभागी होणारे ६६ पुरुष - महिला खेळाडू जाहीर झाले आहेत.

मुंबई : नवी दिल्ली येथे रंगणाऱ्या ‘बास्केटबॉल विदाऊट बॉर्डर्स (बीडब्ल्यूबी) या १०व्या आशियाई शिबिरामध्ये सहभागी होणारे ६६ पुरुष - महिला खेळाडू जाहीर झाले आहेत. या शिबीरात १६ देशांतील युवा बास्केटबॉलपटू सहभागी होणार असल्याची माहिती शिबिर आयोजकांनी दिली. नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन (एनबीए), आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल महासंघ (एफआयबीए) आणि भारतीय बास्केटबॉल महासंघ (बीएफआय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर नवी दिल्ली येथील एनबीए अकादमी येथे ३० मे ते २ जून दरम्यान पार पडेल. या शिबिरात सहभागी होणाºया युवा खेळाडूंना योग्य प्रशिक्षण आणि खेळाच्या तांत्रिक गोष्टींचे ज्ञान देण्यात येणार असून, या सर्वांना बास्केटबॉल कोर्ट गाजवलेल्या दिग्गजांकडून विशेष मार्गदर्शन मिळेल. युवा खेळाडूंना या वेळी अमेरिकेच्या ओकलाहोमा सिटी थंडरचे कोरे ब्रेवर, ब्रुकलिन नेट्सचे कॅरिस लेवर्ट, कॅनडाचे मियामी हीट क्लबचे कॅली ओलेनिक, डलास मावेरिक्सचे ड्वाइट पॉवेल आणि डब्ल्यूएनबीएचे माजी खेळाडू एबॉनी हॉफमान यांच्याकडून तंत्रशुद्ध प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळेल.

बीडब्ल्यूबी आशिया शिबिर सुरू होण्याआधी २७ ते २९ मे दरम्यान बास्केटबॉल डेव्हलपमेंट शिबिर पार पडणार असून यामध्ये भारतातील निवडक १८ महिला खेळाडू सहभागी होतील.
या सर्व खेळाडूंना शिबिराच्या प्रायोजकांच्या वतीने मोफत जर्सी व बुट देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
२००१ सालापासून आयोजित करण्यात येत असलेले बीडब्ल्यूबी आशिया शिबिर आतापर्यंत १२७ देशांमध्ये आयोजित करण्यात आले असून, यामध्ये एकूण ३,१९० खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत यातील ५० खेळाडूंना एनबीए ड्राफ्टमध्येही जागा मिळाली आहे.

Web Title: Asia Basketball camp will be held in Delhi; 66 participants from 16 countries participated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.